Maharashtra Election Assembly : नाशिक जिल्ह्यात १५ जागांसाठी १९६ उमेदवार रिंगणात

Election Update : नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघांत सोमवारी (ता. ४) माघारीअंती ३३७ पैकी १४१ जणांनी माघार घेतल्याने १९६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
Vidhansabha Election
Vidhansabha ElectionAgrowon
Published on
Updated on

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघांत सोमवारी (ता. ४) माघारीअंती ३३७ पैकी १४१ जणांनी माघार घेतल्याने १९६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. यात सर्वाधिक १७ उमेदवार बागलाण, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर आणि मालेगाव बाह्य मतदार संघात आहेत. तर माजी खासदार समीर भुजबळ यांनी नांदगावमधून तर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवला आहे. नाशिक पूर्वमध्ये मनसेचे प्रसाद सानप, देवळालीत शिवसेनेच्या डॉ. राजश्री अहिरराव यांचेही अर्ज कायम राहिल्याने महायुतीपुढे आव्हान असेल.

अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी महायुती व महाविकास आघाडी तसेच मनसेमध्ये उमेदवारांनी बंडखोरांच्या मनधरणीचे प्रयत्न केले. देवळालीत शिवसेनेच्या राजश्री अहिरराव यांनी उमेदवारी कायम ठेवली, तर त्यांच्यासमवेत ‘एबी’ फॉर्म मिळालेले दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी माघार घेतली.

Vidhansabha Election
Election Process : निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य : उपायुक्त हिर्देशकुमार

शहरातील नाशिक पूर्व, पश्चिम व मध्य या तीन मतदार संघांत तीन प्रकारच्या वेगवेगळ्या भूमिका घेतल्याचे बघायला मिळाले. नाशिक मध्यचे मनसेचे उमेदवार अंकुश पवार यांनी माघार घेतली, तर पूर्वचे उमेदवार प्रसाद सानप व पश्चिमचे दिनकर पाटील, इगतपुरीचे काशीनाथ मेंगाळ यांची उमेदवारी कायम आहे. एकाच पक्षाचे वेगवेगळे आदेश आल्याने उमेदवारांमध्येच संभ्रम दिसून आला. चांदवड-देवळामध्ये भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांना चुलत भाऊ केदा आहेर यांनी आव्हान कायम ठेवले आहे.

नाशिक पूर्वमध्ये महायुतीचे अॅड. राहुल विकले व महाविकास आघाडीचे गणेश गिते यांच्याबरोबरच आता मनसेचे प्रसाद सानप यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिल्याने येथे तिरंगी लढत आहे. नाशिक पश्चिममध्ये दोघांनी अर्ज मागे घेतल्याने भारतीय जनता पक्षातील बंडखोरी टळली असून सीमा हिरे यांच्यासमोरील पक्षांतर्गत निर्माण झालेले आव्हान संपुष्टात आले. दुसरीकडे महाविकास आघाडीचे सुधाकर बडगुजर यांच्यासाठी डोकेदुखी ठरणारे माकपचे डॉ. डी. एल. कराड यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला.

Vidhansabha Election
Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीसह ‘महाविकास’मध्ये बंडखोरी

देवळालीत बहुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांच्यासह महाविकास आघाडीचे योगेश घोलप यांच्यासमोर आव्ह्यन निर्माण झाले आहे. नांदगावमधील समीर भुजबळ पांच्या भूमिकेमुळे देवळालीत सरोज अहिरे यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी शिवसेनेने डॉ. राजश्री अहिरराव बांना पक्षाचा एबी फॉर्म दिला. परंतु, त्यांनी माघार न घेतल्याने तिसरा उमेदवार निवडणूक रिंगणार राहिल्याने महायुतीतील फूट दिसलीच त्याशिवाय महाविकास आघाडीसमोरही आव्हान निर्माण झाले आहे.

मालेगाव बाह्य, नांदगावकडे लक्ष

मालेगाव बाह्यमध्ये शिवसेनेचे आमदार व पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना (उबाठा) पक्षाचे अद्वय हिरे व अपक्ष बंडू काका बच्छाव यांच्यातच मुकाबला होईल. भारतीय जनता युवा मोर्चाचे कुणाल सूर्यवंशी यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. नांदगावमध्ये महायुतीचे सुहास कांदे, ‘मविआ’चे गणेश धात्रक, समीर भुजबला व डॉ. रोहन बोरसे यांच्या उमेदवारीमुळे चौरंगी लढत होईल.

विधानसभा मतदार संघ वैध नामनिर्देशित उमेदवार संख्या अर्ज मागे घेतलेल्यांची संख्या निवडणूक रिंगणात राहिलेले उमेदवार

११३-नांदगाव ३२ १८ १४

११४-मालेगाव मध्य १६ ३ १३

११५-मालेगाव बाह्य ३२ १५ १७

११६-बागलाण २६ ९ १७

११७-कळवण-सुरगाणा १५ ८ ७

११८-चांदवड-देवळा २२ ८ १४

११९-येवला ३० १७ १३

१२०-सिन्नर २२ १० १२

१२१-निफाड १७ ८ ९

१२२-दिंडोरी अ.ज २१ ८ १३

१२३-नाशिक पूर्व १५ २ १३

१२४-नाशिक मध्य २१ ११ १०

१२५ नाशिक पश्चिम २२ ७ १५

१२६-देवळाली अ. जा १८ ६ १२

१२७-इगतपुरी अ.ज २८ ११ १७

जि. नाशिक एकूण ३३७ १४१ १९६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com