Rahul Gandhi Agrowon
ॲग्रो विशेष

Rahul Gandhi: निवडणूक आयोगाविरोधात १०० टक्के पुरावे : राहुल गांधी

Election Commission: बिहारमधील मतदार यादी पडताळणीवरून सर्व विरोधक आक्रमक असताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (ता. २४) कर्नाटकमधील मतदार यादीतील गोंधळाचा मुद्दा उपस्थित करून निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.

Team Agrowon

New Delhi News: बिहारमधील मतदार यादी पडताळणीवरून सर्व विरोधक आक्रमक असताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (ता. २४) कर्नाटकमधील मतदार यादीतील गोंधळाचा मुद्दा उपस्थित करून निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. आयोगाविरुद्ध १०० टक्के पुरावे असल्याचा दावा श्री. गांधी यांनी केला आणि आयोगाचे अधिकारी यातून सहजासहजी बाहेर पडू शकणार नाहीत, असा इशाराही दिला.

बिहारमधील मतदार पुनरिक्षण मोहीम तातडीने थांबविण्याच्या मागणीचा मुद्दा विरोधकांच्या इंडिया आघाडीने लावून धरला असून, संसदेत त्यावर चर्चा व्हावी यासाठी बुधवारी आणि गुरुवारी इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या आवारात निदर्शने केली. या मुद्द्यामुळे दोन्ही सभागृहांच्या कामकाजावरही परिणाम झाला.

त्या पार्श्‍वभूमीवर संसद भवनाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना श्री. गांधी यांनी कर्नाटकमधील मतदार यादीतील कथित फेरफार झाल्याच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगावर आरोप केला. ते म्हणाले, की निवडणूक आयोग हा भारतीय निवडणूक आयोगासारखा वागत नाही.

निवडणूक आयोग आपले काम करत नाही, याचे आमच्याकडे भक्कम आणि १०० टक्के पुरावे आहेत. निवडणूक आयोग कर्नाटकमध्ये फसवणुकीला परवानगी देत आहे. आम्ही फक्त एका मतदार संघाकडे पाहिले तर हे आढळले. आम्हाला पक्की खात्री आहे की एकापाठोपाठ एक मतदार संघांत हे नाटक सुरू आहे.

न्यायालयाच्या निकालाची वाट बघा : निवडणूक आयोग

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे आरोप आडवळणाने निरर्थक ठरविण्याचा प्रयत्न केला. आयोगाने यावर अवघ्या दोन ओळींचा खुलासा करताना म्हटले, की या संदर्भात निवडणूक याचिका दाखल केली असेल तर आदरणीय उच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहायला हवी आणि याचिका दाखल केली नसेल तर आता हे निरर्थक आरोप करण्याचे कारण काय?

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Processing Project: शेतकरी गटाचा धान पट्ट्यात टोमॅटो प्रक्रिया प्रकल्प

Sugaracne Payment: लोकनेते देसाई कारखान्याकडून तीन हजारांची पहिली उचल

Human Wildlife Conflict: बिबट्याला मारायची परवानगी द्या

Yatra Management: कार्तिकी यात्रेदरम्यान मंदिर परिसरात वाहनांना बंदी

NCCF Transport Issue: ‘एनसीसीएफ’ वाहतूक निविदा प्रक्रियेत पक्षपात, अनियमिततेचे आरोप

SCROLL FOR NEXT