Rahul Gandhi Agrowon
ॲग्रो विशेष

Rahul Gandhi : द्वेषाचे राजकारण नको, तर प्रेमाचे हवे

Maharashtra Politics : आपल्याला द्वेषाचे राजकारण आणि द्वेषाचा हिंदुस्थान नको आहे. तर प्रेमाचे राजकारण हवे. महाराष्ट्रात सर्व सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे, युवकांचे, मजुरांचे सरकार आणण्यासाठी तुम्ही पुढे येत आहात.

Team Agrowon

Sangli News : छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा काँग्रेस पुढे नेत आहे. त्यामुळे आपल्याला द्वेषाचे राजकारण आणि द्वेषाचा हिंदुस्थान नको आहे. तर प्रेमाचे राजकारण हवे. महाराष्ट्रात सर्व सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे, युवकांचे, मजुरांचे सरकार आणण्यासाठी तुम्ही पुढे येत आहात. जिथे माझी गरज आहे, तिथे तुम्ही मला बोलवा मी येतो, अशी ग्वाही विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी दिली.

कडेगाव (जि. सांगली) येथे भारती विद्यापीठाचे संस्थापक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाचे लोकार्पण सोहळा देशाचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी गुरुवारी (ता. ५) यांच्या हस्ते झाले. या वेळी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथा रेड्डी, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी आमदार मोहनराव कदम, आमदार अरुण लाड, खासदार छत्रपती शाहू महाराज, खासदार विशाल पाटील, डॉ. शिवाजीराव कदम, आमदार विश्‍वजित कदम यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार राहुल गांधी म्हणाले, ‘‘मला येथे येऊन आनंद झाला आहे. कदम यांनी पूर्ण जीवन काँग्रेस पक्षासाठी दिले. विकास, शिक्षणाचे काम केले. महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे. येथील लोकांनी देशाला दिशा दिली. महाराष्ट्रात काँग्रेसची मुळे खूप खोलवर रुजलेली आहेत. महाराष्ट्राच्या डीएनएमध्ये काँग्रेसची विचारधारा आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा इथे येतो, तेव्हा मला हा आमच्या विचारधारेचा गड असल्याची जाणीव होते.’’

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधानांनी माफी मागितली. त्यांच्या माफी मागण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. पहिले कारण म्हणजे पुतळ्याचे कंत्राट संघाच्या कार्यकर्त्याला देण्याचा त्यांना पश्चाताप झाला असावा. दुसरे पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार किंवा चोरी झाली असावी. तिसरे कारण म्हणजे त्यांनी महाराजांच्या सन्मानार्थ पुतळा उभा केला, पण तो फार काळ टिकला नाही, म्हणून मोदी यांनी माफी मागितली असावी, असे राहुल गांधी म्हणाले.

या वेळी मल्लिकार्जुन खर्गे, नाना पटोले, यांच्यासह अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आमदार विश्‍वजित कदम यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Water Tourism: उजनी जलपर्यटनाचे भवितव्य अंधारात

Agriculture Officer Retirement: नाशिक ‘झेडपी’चे कृषी विकास अधिकारी शेवाळे सेवानिवृत्त

Revenue Department: अधिकाऱ्यांनी गावांत जाऊन समस्या सोडवाव्या: मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Water Scheme Delayed: पाणी योजना चार वर्षांपासून रखडली

Summer Fruits Sale: चिंच-बोरांच्या विक्री हंगामाला सुरुवात

SCROLL FOR NEXT