Small Business: भातकुली तालुक्यातील आष्टी व वायगाव बसस्टँड परिसरात सध्या चिंच, बोरांच्या विक्रीचा हंगाम सुरू झाला आहे. ग्रामीण भागातील कष्टकरी महिला-पुरुष भर उन्हात रस्त्यालगत विक्री करतात. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी सुरू असलेली त्यांची ही धडपड लक्ष वेधून घेत आहे..परतवाडा-अमरावती मार्गावरील आष्टी बसस्टँड परिसरात सध्या चिंच व बोरीच्या छोट्या-मोठ्या दुकानांची रांग लागलेली दिसते. भातकुली तालुक्यातील आष्टी, वायगाव, कामनापूर, जावरा व देवरी निपाणी या गावांतील कष्टकरी नागरिक सकाळपासून चिंचा व बोरं गोळा करून बसस्टँड परिसरात विक्रीसाठी बसतात. प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून या आंबट-गोड चिंचा-बोरांना चांगली मागणी असल्याने दिवसभर स्टॉलवर वर्दळ दिसून येते..Summer Foods To Avoid : उन्हाळ्यात 'हे' पदार्थ खाणे नक्की टाळा .आष्टी बसस्टँड परिसरात साधारण चार ते पाच तर वायगाव बसस्टँड परिसरात पाच ते दहा छोटे स्टॉल लावले जातात. ग्रामीण भागातील शेताच्या धुऱ्यावर तसेच रस्त्यालगत असलेल्या चिंचेच्या व बोरीच्या झाडांवरून फळे गोळा करून ती विक्रीसाठी आणली जातात. सध्या उन्हाचा कडाका वाढला असला तरी दिवसभर उन्हात बसून विक्री करताना दिसत आहेत..Mini Saras Exhibition: मिनी सरस उत्पादने विक्री प्रदर्शन, खाद्य महोत्सव सुरू.नागरिकांना रोजगाराचे साधनभातकुली तालुक्यातील आष्टी, वायगाव, कामनापूर, जावरा व देवरी निपाणी परिसरातील अनेक कष्टकरी कुटुंबांसाठी चिंच व बोरांची विक्री हा महत्त्वाचा हंगामी रोजगार ठरत आहे. शेतमजुरीचे काम कमी असलेल्या काळात ग्रामीण भागातील महिला-पुरुष रस्त्यालगतच्या झाडांवरून चिंचा-बोरं गोळा करून बसस्टँड परिसरात विक्री करतात. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले..चिंचेच्या झाडातून उत्पन्नशेतकऱ्यांकडून १० ते १५ हजार रुपयांत चिंचेचे झाड विकत घेतले जाते. त्या चिंचा तोडून विक्रीकरिता आणल्या जातात. दररोज सुमारे ३० ते ४० किलो चिंचा विक्रीसाठी आणत असून त्यांना ५० ते ६० रुपये किलो दर मिळतो. त्यातून दिवसाकाठी सुमारे एक ते दोन हजार रुपये उत्पन्न मिळते. तसेच वाळलेली बोर ४० ते ६० रुपये दर मिळतो, अशी माहिती विक्रेते सुनील देविदास खर्चान व देविदास महादेव खर्चान, सतीश आठवले यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.