Ujani Dam Project Delay: पदभार सोडताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उजनी जलपर्यटन प्रकल्प पूर्ण करता आला नसल्याची खंत व्यक्त केली आहे. उजनी जलपर्यटनाचा २८३ कोटी रुपयांचा आराखडा सप्टेंबर २०२४ मध्ये मंजूर झाला. मंजुरीनंतर ज्या गतीने काम होणे अपेक्षित होते, त्या गतीने काम झाले नाही. .यासाठी आग्रही असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे. तसेच या प्रकल्पासाठी प्रयत्नशील असलेले जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची नागपूरला बदली झाली आहे. आता या प्रकल्पासाठी पुढाकार कोण घेणार, याचे ठोस उत्तर सध्या दिसत नसल्याने प्रकल्पाचे भवितव्य अंधारात दिसत आहे..Well Water Tax: विहिरींवरील अन्यायकारक पाणीपट्टी आकारणी थांबवा.सोलापूरची ओळख सर्वाधिक साखर कारखाने असलेला आणि काही तालुके दुष्काळी असलेला जिल्हा अशी आहे. जिल्ह्यातील ऊस क्षेत्रात दिवसेंदिवस घट होत असताना कारखान्यांची गाळप क्षमता वाढत आहे. त्यामुळे भविष्यात उसाअभावी साखर कारखाने अडचणीत येण्याची शक्यता आहे. हजारो युवकांना रोजगार देणारा मोठा उद्योग सोलापुरात नसल्याने युवकांचे पुणे, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आदी शहरांकडे स्थलांतर होत आहे. या पार्श्वभूमीवर या समस्यांवर तोडगा म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उजनी जलपर्यटन प्रकल्प हाती घेतला होता..उजनीच्या एकात्मिक विकास आराखड्यातून २८२.७५ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यात केंद्रस्थानी उजनी जलपर्यटनाचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत धार्मिक पर्यटनासाठी २५ कोटी, जलपर्यटनासाठी १९०.१९ कोटी, कृषी पर्यटनासाठी १९.३० कोटी आणि वाइनयार्ड पर्यटनासाठी ४८.२६ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कृषी पर्यटनालाही यामुळे चालना मिळण्याचे नियोजन होते..Ujani Dam Water Release: उजनीचे पाणी आळगे-खानापूरमार्गे हिळ्ळी बंधाऱ्याकडे.पंढरपूर व अक्कलकोट येथील देवस्थानांमुळे दरवर्षी लाखो भाविक सोलापुरात येतात. या भाविकांना पर्यटनाचे अन्य पर्याय उपलब्ध व्हावेत, यासाठी उजनी जलपर्यटन प्रकल्प महत्त्वाचा मानला जात होता. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील पर्यटन तसेच पर्यटनावर आधारित रोजगार वाढण्यास मदत होणार होती..भविष्यात रोजगारनिर्मिती आणि सोलापूरची नवी ओळख निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता. या प्रकल्पाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली होती. आता हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका आवश्यक आहे..जलसंपदा विभागाची सकारात्मकता आवश्यकशिखर समितीने या प्रकल्पाला मान्यता दिल्यानंतर तो कोणत्या यंत्रणेमार्फत राबवायचा याबाबत चर्चा झाली. उजनी प्रकल्पाची जागा जलसंपदा विभागाच्या ताब्यात असल्याने हा प्रकल्प महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र जलसंपदा विभाग आणि पर्यटन महामंडळ यांच्यातील समन्वयाअभावी प्रकल्पाला विलंब झाल्याचे समजते. या प्रकल्पासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तसेच संबंधित विभागाने सकारात्मक भूमिका घेतल्यास प्रकल्प मार्गी लागू शकतो. तसेच मोठ्या निधीसाठी मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मकता आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा पाठपुरावा आवश्यक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.