Rahul Gandhi : मोदींनी २०-२५ जणांचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केलं, पण शेतकऱ्यांचा नवा पैसा माफ केला नाही, राहुल गांधी यांचा मोदींवर निशाना

Rahul Gandhi on PM Narendra Modi : देशातील काही उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यात आले आहे. पण शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. यावरून काँग्रेस नेते विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiAgrowon
Published on
Updated on

Pune news : मोदी जर देशातील २५ एक उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ करू शकतात. तर शेतकऱ्यांची कर्जमाफी का नाही? तसेच महाराष्ट्रासह देशाचं प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यावरून पंतप्रधान मोदी यांनी समस्त जनतेची माफी मागायला हवी, असा शाब्दिक हल्ला राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गुरूवारी (ता.५) चढवला. ते काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या सांगली येथे पुतळण्याच्या अनावरण कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार शरद पवार, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, आमदार विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे कर्ज का माफ केले नाही?

सध्या देशातच दोन देश तयार होत असून एक अंबानी अदानींसह उद्योगपतींचा आणि दुसरा शेतकरी, मजूर, बेरोजगारांचा आहे. मोदींनी २० ते २५ उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले. पण शेतकऱ्यांचा नवा पैसा माफ केला नाही. तर काँग्रेसने देशातील शेतकऱ्यांना ७० हजार कोटींची कर्जमाफी दिली. पण मोदींनी मित्रांचा विचार केला. त्यामुळेच आम्ही लढत असून जर श्रींमताचे १६ लाख कोटी माफ होत असतील तर सर्वसामान्यांचेही माफ व्हायला पाहिजेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi And SKM On Kangana Ranaut : कंगनाच्या शेतकरी आंदोलनाच्या वादग्रस्त वक्तव्याला राहुल गांधींचे प्रत्युत्तर; कंगनाने माफी मागावी, संयुक्त किसान मोर्चाची मागणी 

महाराष्ट्रातील सरकारच चोरीने आले

तर महाराष्ट्रातील सध्याचे सरकारच चोरी करून बनविण्यात आले असून येथे पाहाल तिकडे भ्रष्टाचार सुरू आहे. बाहेरचे लोक इथे येऊन कंत्राट घेत आहेत. आपल्याला हे बदलायचं आहे. तुम्ही राज्यात जनतेचं सरकार आणणार आहात. शेतकरी, बेरोजगार आणि प्रत्येक वर्गाचं सरकार तुम्ही आणणार आहात. तुम्हाला जिथे गरज असेल मी येईल. तुम्ही फक्त सांगा, मी हजर असेन, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi Speech : शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं अडकवलं चक्रव्यूहात; राहुल गांधी यांची मोदींवर घणाघाती टिका

मोदींनी समस्य जनतेची माफी मागावी

यावेळी राहुल गांधी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा पडल्यावरून समाचार घेतला. मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली. यावरून राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले. राज्यात काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. तो आठच महिन्यात पडला. त्यानंतर जोरदार टीका झाल्यानंतर पंतप्रधानांनी माफी मागितली. पण पंतप्रधानांनी कोणत्या कारणाने माफी मागितली असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. तर याची वेगवेगळी कारणे असतील असं सांगताना, ते कंत्राट संघाच्या माणसाला दिले असावे, कंत्राटात भ्रष्टाचार झाला असावा किंवा जेंव्हा पुतळा तयार होत होता त्यावेळी योग्य काळजी घेतली नाही. यामुळेच ते आता माफी मागत आहेत. पण त्यांनी फक्त शिवाजी महाराजांची माफी न मागता समस्त जनतेची माफी मागायला हवी होती, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

भाजपचा संविधानावर घाला

तर महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देखील एकचसारखीच विचारसरणी होती. तिच विचारसरणी आपल्या संविधानात दिसते. त्यामुळेच भाजपवाले संविधानावर घालत आहेत. आरएसएस मिळेल तेथे मिरट न पाहता आपली लोकं घुसवत आहे. यांचे काम फक्त संविधानावर वार करण्याचे आहे, असा हल्लाबोल देखील राहुल गांधी यांनी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com