ZP Agriculture Officer: नाशिक जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय आबाजी शेवाळे ३२ वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर ३१ मार्च २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. ३१ मार्च रोजी सुटी असल्याने त्यांचा निरोप समारंभ ३० मार्च रोजी नवीन जिल्हा परिषद इमारतीच्या सभागृहात उत्साहात पार पडला..कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, वर्षा फडोळ, जिल्हा कृषी अधिकारी वरुण पाटील यांसह जिल्हा परिषदेचे विविध विभाग प्रमुख व शेवाळे यांचा परिवार उपस्थित होता..Health Worker Recruitment: सरळ सेवा भरतीअंतर्गत आरोग्यसेवकांना नियुक्तीपत्र.अध्यक्षीय भाषणात ओमकार पवार यांनी शेवाळे यांच्या कार्याचा गौरव केला. विशेषतः आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी राबविलेला ‘तुती लागवड व रेशीम उद्योग’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम उल्लेखनीय ठरल्याचे त्यांनी नमूद केले..Agriculture Workshop: संभाजीनगरला शेतकऱ्यांसाठी मोफत कार्यशाळा.यावेळी त्यांच्या महाविद्यालयीन मित्रांनी व कुटुंबीयांनी शेवाळे यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी विजय धात्रक यांनी केले..३२ वर्षांचा सेवाप्रवासश्री.शेवाळे यांनी १९ ऑक्टोबर १९९४ रोजी मालेगाव येथून मंडळ कृषी अधिकारी म्हणून सेवेला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी कळवण, नाशिक, इगतपुरी अशा विविध ठिकाणी तालुका कृषी अधिकारी व तंत्र अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. ३० ऑगस्ट २०२४ पासून ते नाशिक जिल्हा परिषदेत कृषी विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.