Watermelon Agrowon
ॲग्रो विशेष

Watermelon Food Processing : कलिंगडापासून रस, सरबत आणि सिरप

Watermelon : कलिंगडापासून रस, सरबत आणि सिरप कसे बनवतात याबद्दलची माहिती या लेखातुन पाहुयात.

Team Agrowon

Article on Watermelon :

कृष्णा काळे, डॉ. सचिन शेळके

रस :

रस तयार करण्यासाठी पूर्ण पक्व झालेली निरोगी कलिंगडाची फळे निवडावीत. फळे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत.

त्यानंतर कलिंगडाचे तुकडे करून गर काढावा. गरातील बिया बाजूला काढाव्यात. कलिंगड गर स्क्रू टाइप ज्यूस एक्स्ट्रॅक्टर यंत्रामधून काढून घ्यावा.

एकजीव झालेला गरातून हायड्रॉलिक बास्केट प्रेस या यंत्राचा वापर करून रस काढून घ्यावा.

कलिंगड रस जास्त काळ साठवून ठेवायचा झाल्यास तो पाश्चराईझ करून, त्यात १०० पीपीएम सोडिअम बेन्झोएट या परिरक्षकाचा वापर करावा.

तयार रस बाटलीमध्ये हवाबंद करून पाश्‍चराइझ करून घ्यावा. रस भरलेली बाटली थंड झाल्यावर थंड आणि कोरड्या जागी ठेवावी.

सरबत :

रसापासून उत्तम प्रकारचे सरबत तयार करता येते. यासाठी कलिंगडाचा रस १५ टक्के, साखर १० टक्के आणि उरलेले पाणी असे घटक वापरले जातात.

१०० ग्रॅम कलिंगडाचा रस, १०० ग्रॅम साखर, १० ग्रॅम जिरे पावडर पातेल्यात घेऊन चमच्याच्या साह्याने व्यवस्थित एकत्रित करून घ्यावे. त्यात पाणी घालून मिश्रण पुन्हा व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.

मिश्रण चांगले ढवळून मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. त्यानंतर पाश्‍चराइझ करून त्यामध्येत १०० पीपीएम सोडिअम बेन्झोएट या परिरक्षकाचा वापर करावा.

तयार सरबत थंड झाल्यावर त्याचा आस्वाद घ्यावा.

तयार सरबत बाटलीमध्ये भरून हवाबंद करून कोरड्या जागी ठेवावा.

सिरप :

सिरप तयार करण्यासाठी रस ३० टक्के, साखर ६० टक्के व सायट्रिक आम्ल १.५ टक्का यांची आवश्यकता असते.

एक लिटर कलिंगड रस घेऊन त्यात १ किलो साखर, ३५ ग्रॅम सायट्रिक आम्ल आणि ६०० मिलि पाणी मिसळावे. मिश्रण मोठ्या व जाड तळ असलेल्या भांड्यामध्ये मध्यम आचेवर १० ते १५ मिनिटे गरम करावे. गरम करत असताना मिश्रण सतत हलवावे. जेणेकरून मिश्रण खालील बाजूला करपणार नाही.

मिश्रण आवश्यक तितके घट्ट झाल्यानंतर चाळणीतून गाळून घ्यावे.

एका ग्लासमध्ये थोडे सिरप घेऊन त्यात ०.६ ग्रॅम सोडिअम बेन्झोएट विरघळून घेऊन ते सिरपमध्ये घालावे.

तयार झालेले कलिंगडाचे सिरप निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करून कोरड्या व थंड जागी साठवावा.

जॅम :

जॅम बनविण्यासाठी पूर्ण पक्व झालेल्या कलिंगड फळांचा १ किलो गर, साखर ७५० ग्रॅम, सायट्रिक ॲसिड ८ ग्रॅम इत्यादी गोष्टी लागतात.

सुरुवातीला पक्व कलिंगडाची फळे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर चाकूने कलिंगड फळे कापून त्यातील बी वेगळे करावे. फळाची साल बाजूला काढून गर व्यवस्थित मिक्सरमध्ये एकजीव करावा.

त्यानंतर गरामध्ये ७५० ग्रॅम साखर आणि ८ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून मिश्रण मंद आचेवर गरम करावे.

मिश्रण गरम करत असताना मिश्रणाचा टीएसएस ६८.५ टक्के इतका आल्यानंतर जॅम तयार झाला असे समजावे.

जॅम थोडा थंड झाल्यावर निर्जंतुक काचेच्या बरण्यांमध्ये भरावा. बरणीवर थोडे पॅराफिन वॅक्स ओतावे. अशारीतीने उत्तम प्रतीचा टिकाऊ जॅम तयार होतो. बरण्या थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात. त्यामुळे जॅम चांगला राहतो.

कृष्णा काळे, ८८०५९६८५३६

(लेखक अन्नप्रक्रिया विषयातील तज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

Daytime Electricity : शेतीला दिवसा वीज द्या, महावितरणला दिले निवेदन

Maharashtra Election Results 2024 : मुख्यमंत्री शिंदे, फडणीस, अजित पवार, मुंडे आघाडीवर, भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर

Assembly Election Result : कोल्हापुरातून मुश्रीफ, महाडिक आघाडीवर तर सांगलीत जयंत पाटील, विश्वजीत कदम, गाडगीळ यांची आघाडी

SCROLL FOR NEXT