Watermelon Crop Damage : पाण्याअभावी टरबूज, खरबूज पीक धोक्यात

Effects on Crops Due to Climate : बदललेले हवामान, विहिरीच्या पाण्याच्या पातळीत झालेली घट यामुळे या पिकाला मुबलक पाणी न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील टरबूज, खरबूज पिकांचे वेल वाळून नुकसान होत आहे.
Watermelon, melon crop
Watermelon, melon cropAgrowon

Devla News : रमजान पर्व व उन्हाळा लक्षात घेऊन कसमादेतील बहुतांशी शेतकऱ्यांनी टरबूज व खरबूज लागवड केली. परंतु बदललेले हवामान, विहिरीच्या पाण्याच्या पातळीत झालेली घट यामुळे या पिकाला मुबलक पाणी न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील टरबूज, खरबूज पिकांचे वेल वाळून फळाला उन्हाचा चटका बसू लागल्याने फळ खराब होऊन नुकसान होत आहे.

उन्हाळ्यात भाव मिळेल या अपेक्षेने कसमादे भागातील खामखेडा, सावकी, भादवन, पिळकोस, डांगसौंदाणे, कळवण तालुक्यातील पश्चिम भागातील बहुतांश शेतकरी दरवर्षी टरबुजाची लागवड करतात. मात्र यावर्षी मागील १५ दिवसापासून विहिरींच्या पाण्याच्या पातळीत उष्णतेमुळे घट झाल्याने टरबूजाला पाणी कमी पडू लागले आहे. त्याचबरोबर करपा रोगामुळे मोठ्या प्रमाणावर पीक बाधित होऊ लागले आहे.

Watermelon, melon crop
Watermelon Production : केळीच्या माहेरघरात कलिंगडाचा बोलबाला

टरबुजाची लागवड केल्यानंतर साठ ते सत्तर दिवसांत हे पीक येते. पिकाची फळ धारणा झाल्यानंतर चाळीस दिवसाच्या पुढील पिकास पाण्याची मोठ्या प्रमाणावर गरज असते. मात्र सध्या पन्नास ते साठ दिवसाच्या या पिकाला पाण्याची अधिकची गरज असताना पाणी कमी पडू लागल्याने तसेच पिकावर करपा व डाऊनीचा प्रादुर्भाव झाल्याचे शेतकरी सनगात आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या या पिकाचे वेल सुकून फळ उघडी पडू लागली आहेत. त्यामुळे फळांची वाढ देखील खुंटली आहे.

Watermelon, melon crop
Healthy Watermelon : आरोग्यदायी कलिंगड

उन्हाची वाढलेली तीव्रता व फळ उघडी पडू लागल्याने तयार होण्याच्या टप्प्यात फळ वरच्या बाजूने खराब होऊन फळावर उन्हाच्या चटक्याने डाग दिसू लागले आहेत. टरबूज सोबतच खामखेडा भागातील अनेक शेतकरी खरबूज पिकाचे देखील लागवड करतात. खरबूज पिकाचे देखील हीच अवस्था असून काढणीला आलेल्या खरबूज पिकातील वेल देखील वाळल्याने पिकाचे नुकसान होत आहे.

मार्च महिन्यात रमजान सणामुळे टरबूज व खरबूज पिकाला चांगली मागणी राहील म्हणून लागवड केली. मात्र ऐन पीक तयार होण्याच्या टप्प्यात विहिरींची पाणी कमी पडल्याने तसेच पिकावर करपा रोग आल्याने खर्च देखील निघणार नाही.- हेमंत मोरे, शेतकरी, खामखेडा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com