Watermelon Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Watermelon Cultivation : रांझणी, प्रतापपुरात टरबूज लागवड

Team Agrowon

Taloda News : तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, चिनोदा परिसरात टरबूज लागवडीस सुरवात झाली असून, आता वातावरण निरभ्र राहू लागल्याने शेतकऱ्यांकडून वेलवर्गीय पिकांची लागवड करण्यास प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान, हे पीक ७० ते ८० दिवसांनंतर ऐन उन्हाळ्यात परिपक्व होणार आहे. त्यामुळे त्या वेळी त्याला चांगला भावही मिळू शकतो, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

तळोदा शहर व तालुक्यातील बोरद, मोड, तळवे, रांझणी, चिनोदा, प्रतापपूर, गोपाळपूर, रोझवा पुनर्वसन परिसरातील शेतकरी पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक शेतीकडे वळला आहे. तळोदा शहर व परिसरात काही वर्षांपासून नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये टरबूज, खरबूज पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येत होती.

परंतु अनियमित हवामानामुळे शेतकऱ्यांकडून या पिकाच्या लागवडी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या पिकाची सर्वत्र लागवड करण्यात येत असून, त्यासाठी शेतकऱ्यांकडून शेताची उत्तमरीत्या मशागत करण्यात येऊन मल्चिंग पेपर, ठिबकच्या सहाय्याने महागडे बियाणे आणून टरबूज लागवड करण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांकडून इतर जिल्ह्यांतून टरबूज रोपे आणून त्यांची लागवड करण्यात येत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांतील ढगाळ वातावरणामुळे महागडे मल्चिंग पेपर, ठिबक, महागडे बियाणे, लागवड मंजुरी, फवारणीचा खर्च याबाबत विचार करता शेतकऱ्यांकडून टरबुजाचे पीक घेणे टाळले जात होते; परंतु आता त्याची लागवड करण्यात येत असून, टरबुजाचे हे पीक ७० ते ८० दिवसांनंतर ऐन उन्हाळ्यात परिपक्व होणार आहे. त्यामुळे त्या वेळी त्याला चांगला भावही मिळू शकतो, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

गेल्या वर्षी चार एकर क्षेत्रात टरबुजाची लागवड केली होती. चांगल्या हवामानामुळे फळधारणा चांगली होऊन भावही चांगला मिळाला होता; परंतु या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे टरबूज लागवड केली नव्हती, पण आता लागवड करीत आहे.
महेंद्र भारती, टरबूज उत्पादक शेतकरी
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये टरबूज लागवड करण्यासाठी दीड ते दोन लाखांचे बुकिंग होते; परंतु या वर्षी निसर्गाच्या अनियमितपणामुळे बुकिंग झालेले नव्हते. पण आता शेतकऱ्यांकडून टरबूज रोपांची मागणी होत असून, त्यांना इतर रोपवाटिकांतून रोपे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
दीपक मराठे, रोपवाटिका संचालक, रांझणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT