Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड सुरूच

Kalingad Lagvad : खानदेशात कलिंगडाची लागवड सुरूच आहे. लागवड यंदा कमी झाली असून, सुमारे ३०० हेक्टरवर कलिंगड पीक सध्या आहे.
Watermelon Cultivation
Watermelon CultivationAgrowon

Jalgaon News : खानदेशात कलिंगडाची लागवड सुरूच आहे. लागवड यंदा कमी झाली असून, सुमारे ३०० हेक्टरवर कलिंगड पीक सध्या आहे. त्यात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. खरबुजाची लागवड मात्र यंदा अल्प आहे.

कलिंगडाची लागवड खानदेशात नंदुरबारातील तळोदा, शहादा भागात अधिकची घटली आहे. या भागातील लागवड ३० टक्केही झालेली नाही. अनेकांनी रमजान महिन्यात आवक किंवा काढणी होईल, या दृष्टीने लागवडीचे नियोजन केले होते. परंतु प्रतिकूल वातावरण व अधिकचा खर्च यामुळे लागवड टाळली आहे.

Watermelon Cultivation
Watermelon Cultivation : कलिंगड, खरबूज लागवड तंत्र

जळगाव जिल्ह्यातही लागवड निम्मी घटली आहे. मागील हंगामात जिल्ह्यात डिसेंबर ते मार्च या कालावधीत कलिंगडाची लागवड झाली होती. एकूण लागवड १२०० हेक्टरपेक्षा अधिक झाली होती. परंतु यंदा डिसेंबर व जानेवारातील लागवड अत्यल्प आहे. काही शेतकऱ्यांनी रमजान महिन्यातील बाजार हेरण्यासाठी डिसेंबरच्या मध्यात लागवड केली आहे. ही लागवड जळगाव जिल्ह्यातील जामनेर, चोपडा भागात अधिक आहे.

अन्य भागात मात्र लागवड अनेकांनी टाळली आहे. आतापर्यंत खानदेशात मिळून ३०० हेक्टरवर कलिंगड लागवड झाल्याचा अंदाज आहे. ही लागवड या महिन्यातही काही शेतकरी करतील. मार्चच्या पहिल्या आठवड्यातही लागवड होईल.

परंतु यंदाची लागवड जेमतेम ४०० ते ४५० हेक्टरपर्यंतच होईल, असा अंदाज आहे. कारण मागील हंगामात पिकाचे रोगराईत नुकसान झाले. दरही कमी होते. त्यात मोठे वित्तीय नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले.

Watermelon Cultivation
watermelon Market : खानदेशात कलिंगड आवक कमी, दर स्थिर

कलिंगडाची लागवड या महिन्यात ८० ते ९० हेक्टरवर होईल. तर पुढील महिन्यातील लागवड यापेक्षा कमी राहील, अशी माहिती मिळाली. कलिंगडासाठी खानदेशात जामनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा व शहादा हा भाग प्रसिद्ध आहे. यात एकट्या जामनेरातील लागवड ३०० ते ३५० हेक्टरपेक्षा अधिक व्हायची.\

परंतु यंदा जामनेरातील लागवड अल्प आहे. जामनेरातील हिवरखेडा, पळासखेडा, हिंगणे, नेरी, जामनेर, सामरोद, गारखेडा, तोंडापूर व अन्य भागात कलिंगडाची मोठी लागवड करण्यात येत होती. परंतु या सर्वच गावांमधील लागवड यंदा कमी झाल्याची माहिती मिळाली.

चोपड्यातही माचले, गोरगावले, सनपुले, लोणी, पंचक, यावलमधील डांभुर्णी, किनगाव, साकळी व परिसरात कलिंगड पीक असते. या भागतही लागवड यंदा कमी झाल्याचे सांगण्यात आले. खानदेशात कलिंगड लागवड घटली आहे. परंतु मध्य प्रदेशातील जळगावलगतच्या भागात लागवड वाढली आहे. तेथील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील इच्छापूर, नाचणखेडा, दापोरी, फोपनार, लोणी व तापीकाठालगत लागवडीत मोठी वाढ झाल्याची माहिती आहे.

खरबूज अल्प

खानदेशात खरबुजाची लागवड मागील दोन-तीन वर्षे २०० हेक्टरपेक्षा अधिक असायची. यंदा खरबूज लागवडदेखील अत्यल्प आहे. ही लागवड यंदा जेमतेम ५० हेक्टर एवढी आजघडीला असल्याची माहिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com