Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : उजनी धरणातून शेतीसाठी एक नोव्हेंबरपासून पाणी सोडणार

Ujani Water Release : १ नोव्हेंबरपासून उजनीतून शेतीसाठी पाणी सोडण्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली.

Team Agrowon

solapur News : उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कमी प्रमाणात झाल्याने उजनी धरणाच्या पाणीपातळीत (Dam Water levels) घट झाली आहे. परंतु नागरिक व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करताना शेतीच्या पाण्यासाठीही पाण्याची आवश्यकता आहे,अशी मागणी होत असल्याने येत्या १ नोव्हेंबरपासून उजनीतून शेतीसाठी पाणी सोडण्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उजनी प्रकल्पातील पाण्याच्या नियोजनाबाबत पालकमंत्री पाटील यांनी सोमवारी (ता.१६) आढावा बैठक घेतली. आमदार बबनदादा शिंदे, सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, रणजीतसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महसूल उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता धीरज साळी, इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘उजनी धरणातील पातळी ६०.६६ टक्के असल्याने उपलब्ध पाण्याबाबत सर्वांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजन करावे. धरण परिसरातील अनधिकृत पाण्याचा उपसा होणार नाही, याबाबत जलसंपदा विभागाने दक्षता घ्यावी,’’ अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

कालवा समितीची बैठक २५ ऑक्टोबरला

उजनीसह जिल्ह्यातील सीना माढा उपसा योजना, भीमा सीना जोड कालवा, दहिगाव उपसा योजना, त्याशिवाय चार मोठे प्रकल्प व सात मध्यम प्रकल्पांसह ५६ लघू प्रकल्पातील सर्व पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी नियोजन सुरू आहे. येत्या २५ आणि २६ ऑक्टोबरला त्यासाठीच कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजिण्यात आल्याची माहितीही पालकमंत्री पाटील यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT