Irrigation Department Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Department : चार प्रकल्पांतून फेब्रुवारीपर्यंत मिळणार पाणी

Rabi Irrigation : फेब्रुवारी २०२४ पर्यंत पाण्याची आवर्तने जाहीर करून नांदेड पाटबंधारे मंडळाने दिलासा दिला आहे. या नियोजनानुसार रब्बीसाठी सिंचन आवर्तनांचे नियोजन जाहीर केले आहे.

Team Agrowon

Nanded News : रब्बी हंगामाकडे आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांना ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प, निम्न मानार प्रकल्प, शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प आणि पूर्णा पाटबंधारे विभागाद्वारे फेब्रुवारी २०२४ पर्यंत पाण्याची आवर्तने जाहीर करून नांदेड दिलासा दिला आहे. या नियोजनानुसार रब्बीसाठी सिंचन आवर्तनांचे नियोजन जाहीर केले आहे.

रब्बीसाठी ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प (इसापूर धरणातील) उपलब्ध पाणीसाठ्यानुसार, एकूण चार आवर्तने देण्याचे निश्चित केले आहे. पहिले आवर्तन उजव्या व डाव्या कालव्यातून २५ नोव्हेंबरपर्यंत सोडण्यात येईल.

दुसरे आवर्तन ५ ते २५ डिसेंबर २०२३ या कालावधीत तर तिसरे आवर्तन ५ ते २५ जानेवारी २०२४ आणि चौथे आवर्तन ५ ते २५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत सोडण्यात येईल. या सर्व आवर्तनांचा कालावधी २० दिवसांचा राहील.

निम्न मानार प्रकल्पासाठी (ता. कंधार) एकूण तीन आवर्तने डावा व उजवा कालव्यासाठी सोडण्यात येईल. पहिले आवर्तन २५ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत तर दुसरे आवर्तन ३० डिसेंबर २०२३ ते १३ जानेवारी २०२४ या कालावधीत तर तिसरे आवर्तन २९ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत सोडण्यात येईल. पहिले आवर्तन २० दिवसांसाठी तर दुसरे व तिसरे आवर्तन १५ दिवसांसाठी राहील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्ग राज्याची रक्तवाहिनी, शेतकऱ्यांना पाचपटीने मोबदला मिळणार- बावनकुळे

Jowar Pomegranate Rate: ज्वारी, उडदाचे भाव चढ-उतार; डाळिंबाचे दर तेजीत

Sugar Industry: सांगली जिल्ह्यातील साखर उद्योगाला १६८ कोटींचा ‘सॉफ्ट’ आधार

Sunflower Sowing Preparation: खानदेशात सूर्यफूल पेरणीची तयारी

Agrowon Podcast: ज्वारी बाजारात चढ-उतार, उडदाच्या आवकेत बदल, हिरव्या मिरचीच्या दरात स्थिरता, कोथिंबीर दरात चढ-उतार तर डाळींबाचे दर तेजीत

SCROLL FOR NEXT