Ahmednagar News : यंदाच्या पावसाळ्यात पाऊस झाला नाही, परतीचा पाऊसही पडला नाही. खरिपात दहा-पंधरा टक्केही उत्पादन पदरात पडलं नाही. पाऊसच नसल्याने एखादा अपवाद वगळला, तर कोणत्याही शेतकऱ्याला रब्बीची पेरणी करता आली नाही. ज्यांनी पेरले ते उगवले नाही. आताच पाणी नाही.
त्यामुळे रब्बीचे तर सोडाच, आता माणसे-जनावरे जगविण्यासाठी संघर्ष करायचाय, आमच्या पठार भागात दरवर्षीच पाणीटंचाई असते, यंदा मात्र परिस्थिती अधिक गंभीर आहे. संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरात हरिनाम सप्ताहासाठी बसलेल्या शेतकऱ्यांची यंदाच्या दुष्काळाची गंभीरता तेवढ्याच तीव्रतेने सांगितली.
ऊस, साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यातील अनेक भागात कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी तर रब्बीत ज्वारी, हरभरा, गव्हासारखी पिकेही घेतली जातात.
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील सारोळे पठार, माळेगाव पठार, सावरगाव घुले, कर्जुले पठार, वरुडी पठार, पोरखी बाळेश्वर, जवळे बाळेश्वर, पिंपळगाव माथा, महालवाडी या गावांच्या शिवारातही पावसावरच बहुतांश शेती आणि शेतीवरच तेथील अर्थकारण अवलंबून आहे.
पण दरवर्षीच्या तुलनेत यंदा पंचवीस टक्केही पाऊस झालेला नाही. यंदा रब्बीच्या पेरण्याचं सोडा, पाणी आजच नाही. आता जनावरं, माणसं जगवायची कसरत करावी लागणार आहे. दुष्काळ, पाऊस पीक परिस्थिती आणि पुढील काळातील स्थितीवर चर्चा करताना ज्येष्ठ शेतकरी पोपटराव क्षीरसागर, दिनकर काकड, संदीप काकड, तुषार काकड, किसन बांबळे, यांच्यासह तेथे असलेले तरुण शेतकरी यांनी दुष्काळी स्थितीवर चिंता व्यक्त केली.
पावसाचा खंड, वाढ खुंटलेली असल्याने सोयाबीन, बाजरी, भुईमुगाची एक क्विंटलपर्यंतही उत्पादकता नाही. पीकविम्याबाबत काहीही सांगितले जात नाही.
रब्बीत ज्वारी, हरभरा पेरतात. यंदा शिवारात पाच टक्केही पेरण्या झाल्या नाही. ज्यांनी पेरले ते उगवले नाही. शिवार उजाड दिसतो आहे.
पाणी नसल्याने चाराही नाही. त्यामुळे दुभती जनावरे, शेळ्या-मेंढ्या विकण्याची वेळ.
या भागात फळबागांचे प्रमाण अल्प, पण त्याही जगण्याची शाश्वती नसल्याने काढणे सुरू.
पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. रोजगारा ग्रामस्थांचे स्थलांतर.
कृषी विभाग बेफिकीर : संगमनेर तालुक्यातील डोळासणे गाव व परिसरात यंदा तीव्र दुष्काळ आहे. मात्र कृषी विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांकडे साधी पेरणीक्षेत्र, झालेला पाऊस याची माहिती नसल्याची बाब उघड झाली.
तलाठ्यांना विचारताच पावसाची आकडेवारी सांगतो, पेरणी व इतर कृषी सहायकांकडून घ्यायचा सल्ला दिला. कृषी सहायक म्हणाले, की माझ्याकडे नाही, मंडळ अधिकाऱ्यांकडून घ्या, शेवटी वरिष्ठांकडे बऱ्याच वेळेनंतर आवश्यक ती माहिती मिळाली. मात्र एकीकडे लोक दुष्काळात होरपळत असताना त्यांची गांभिर्यता कर्मचाऱ्यांना नसल्याचे उघड झाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.