Rain Alert Agrowon
ॲग्रो विशेष

Water Stock : प्रकल्पांतील पाणीसाठा वाढला

Rain Update : सांगली जिल्ह्यात जून महिन्यात दमदार पाऊस झाल्याने मध्यम व लघू प्रकल्पांतील पाणीसाठा वाढला आहे. जून महिन्यात १२६५ दशलक्ष घनफूट म्हणजे १६ टक्के पाणीसाठा होता.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात जून महिन्यात दमदार पाऊस झाल्याने मध्यम व लघू प्रकल्पांतील पाणीसाठा वाढला आहे. जून महिन्यात १२६५ दशलक्ष घनफूट म्हणजे १६ टक्के पाणीसाठा होता. एका महिन्यात ८३ प्रकल्पांत एकूण ४११२ दशलक्ष पाणीसाठा झाला आहे. त्यापैकी उपयुक्त २९२० दशलक्ष घनफूट म्हणजे ३७ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात ५ मध्यम व ७८ लघू असे एकूण ८३ प्रकल्प आहेत. या प्रकल्पाची साठवण क्षमता ९४४० दशलक्ष घनफूट इतकी आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पांत २३५९ दशलक्ष पाणीसाठा आहे. त्यापैकी १२६५ दशलक्ष घनफूट म्हणजे १६ टक्के एवढा उपयुक्त पाणी साठा होता. जून महिन्यात सर्वसाधारण १२९ मिलिमीटर इतका पाऊस होतो.

जून महिन्यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. तर काही भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. या काळात २२६ मिलिमीटर म्हणजे १७५ टक्के पाऊस पडला. त्यामुळे मध्यम व लघू प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात १६ टक्के पाणीसाठा उपयुक्त होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पात एकूण पाणीसाठा ४११२ दशलक्ष घनफूट म्हणजे ३६ टक्के झाला आहे.

मध्यम व लघू प्रकल्पांतील पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)

तालुका प्रकल्प संख्या उपयुक्त पाणीसाठा टक्के

तासगाव ७ ४०४.३१ ७२

खानापूर ८ १९६.२८ ३६

कडेगाव ७ ३७३.४१ ५९

शिराळा ५ ३४३.५५ ३९

आटपाडी १३ ७५८.५२ ६६

जत २७ ५७९.४६ १९

कवठेमहांकाळ ११ १८३.६७ २२

मिरज ३ ७८.२० ६५

वाळवा २ ३.०८ ६

एकूण ८३ २९२०.४९ ३७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

Maharashtra Assembly Election Result 2024 : ‘ते’ पुन्हा आले!

Vidhansabha Election 2024 : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महायुतीचाच प्रभाव

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT