Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : नांदेडमधील पाणीसाठा ५२ टक्क्यांपर्यंत खालावला

Water Crisis : सध्या एकूण १०४ प्रकल्पात ३८३.३५ दशलक्ष घनमीटरनुसार ५२.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात सध्या कमाल तापमानात वाढ झाल्याने पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. यासह शेतीसिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. सध्या एकूण १०४ प्रकल्पात ३८३.३५ दशलक्ष घनमीटरनुसार ५२.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मागील वर्षी याच कालावधीत ४३४.०३ दलघमीनुसार ५९.६१ टक्के पाणीसाठा होता अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यात मागील वर्षी पावसाळ्यात झालेल्या पावसामुळे संपूर्ण प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला होता.

यामुळे जिल्ह्यातील सर्वच १०४ प्रकल्पांत समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. परंतु या उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. तसेच शेतीसिंचनासाठी पाणी पाळ्या देण्यात येत असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.

आजघडीला जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात सध्या प्रकल्पात ४२.७४ दलघमीनुसार ४३.९१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार (बारुळ) प्रकल्पात ६०.६९ दलघमीनुसार ५२.९० टक्के पाणीसाठा आहे. यासोबतच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पांत ५८.६४ दलघमीनुसार ४२.१७ टक्के पाणीसाठा आहे.

चार कोल्हापुरी बंधाऱ्यात २.७६ दलघमीनुसार ३७.११ टक्के पाणीसाठा आहे, ८० लघू प्रकल्पात १००.७० दलघमीनुसार ५८.२८ टक्के पाणीसाठा आहे. नऊ उच्च पातळी बंधाऱ्यात ११७.८१ दलघमीनुसार ६२.०७ टक्के पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात एकूण १०४ प्रकल्पांत ३८३.३५ दशलक्ष घनमीटरनुसार ५२.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यासोबतच नांदेड जिल्ह्याशेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ४१४.८० दलघमीनुसार ५१.२२ टक्के पाणीसाठा आहे. तर सिद्धेश्‍वर प्रकल्पात ४४.६७ दलघमीनुसार ५५.१७ टक्के पाणीसाठा आहे.

तसेच यवतमाळ जिल्ह्यातील ऊर्ध्व पैनगंगा (इसापूर) या प्रकल्पात ६२३.३७ दलघमीनुसार ६४.६६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, मागील वर्षी याच कालावधीत ४३४.०३ दलघमीनुसार ५९.६१ टक्के पाणीसाठा होता, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

नांदेड पाटबंधारे मंडळातील प्रकल्पनिहाय पाणीसाठा

प्रकल्प दलघमी टक्केवारी

विष्णुपुरी ४२.७४ ५२.९०

मानार ६०.६९ ४३.९१

मध्यम प्रकल्प (९) ५८.६४ ४२.१७

लघू प्रकल्प (८०) १००.७० ५८.२८

उच्चपातळी बंधारे (९) ११७.८० ६२.०७

को.प. बंधारे (चार) २.७६ ३७.११

एकूण प्रकल्प ३८३.३५ ५२.६५

जिल्ह्याशेजारील प्रकल्प

येलदरी ४१४.८० ५१.२२

सिद्धेश्‍वर ४४.६७ ५५.१७

इसापूर ६२३.३७ ६४.६६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता

Local Body Elections: सोलापुरात ‘आयात’ नेत्यांच्या जोरावर भाजपची मोर्चेबांधणी

E Crop Survey: रब्बी हंगामातील ४ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी बाकी

Maharashtra Elections 2026 Exit Poll: 'भाजप'चेच वर्चस्व; मुंबई ठाकरेंच्या हातून निसटणार, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

Cotton Rate: कापसाच्या भावात चढ उतार कशामुळे सुरू आहेत?

SCROLL FOR NEXT