water storage agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : जनता हैराण! राज्यातील जलसाठा आला ३५.१० टक्क्यांवर

Dam Water Storage : राज्यात यंदा दुष्काळाची भीषणता वाढत असून जनता हैराण झाली आहे. अनेक जिल्ह्यात पाणीबाणी जाहीर करण्यात आली असून धरणातील पाणी फक्त पिण्यासाठीच आरक्षित करण्यात आले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात तीव्र उन्हाचे चटके बतस असून वाढत्या उष्म्याने जनता हैराण झाली आहे. तर विविध जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून येणाऱ्या काळात स्थिती अधिक गंभीर होण्याची स्थिती आहे. यादरम्यान राज्यातील प्रमुख मोठ्या धरणातील पाणीसाठा ३५.८८ टक्क्यांवर आला आहे. तर सर्वांत कमी पाणीसाठ्याची नोंद छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली आहे. तर राज्यातील १४५२ गावे, ३३०१ वाड्यावस्ता आणि पाड्यांवर १८५८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यादरम्यान मात्र नेते आणि प्रशासन लोकसभा निवडणुकांच्या मरणधुमाळीत गुंतले आहे. यामुळे राज्यातील पाणीप्रश्न अधिक गंभीर होण्याचा शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

राज्यात एकूण २,९९४ प्रकल्पांची संख्या असून या प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठ्यांची क्षमता ४० हजार ४८५.०५ दशलक्ष घनमीटर आहे. मात्र सध्या या प्रकल्पांमध्ये १५ हजार ५२७.०४ दशलक्ष घनमीटर साठा उरला आहे. जो ३५.८८ टक्के आहे. तर गेल्या वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा ४४.८० टक्के होता.

कोणत्या विभागात किती पाणी?

तर राज्यातील विभागांचा विचार केल्यास नागपूर विभागात १६ मोठ्या धरणांमध्ये ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यात येणाऱ्या १० धरणांमध्ये ४३.५७ टक्के पाणीसाठा आहे . तर छ. संभाजी नगर विभागात पाण्याची भीषण टंचाई असून ४४ धरणांमध्ये फक्त १९.७४ टक्के पाणीसाठा आहे. तसेच नाशिक विभागात ३७.३८ टक्के पाणीसाठा असून पुणे विभातील ३५ धरणांमध्ये ३३.४५ टक्के पाणी साठा आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील भीमा उजनी धरणातील पाणीसाठा शून्य टक्क्यांवर गेला आहे. येथे गेल्या वर्षी २३.५१ टक्के आजच्या दिवशी पाणीसाठा होता. कोकणातील ११ धरणांमध्ये सध्या ४२.८१ टक्के पाणीसाठा आहे.

१८५८ टँकरने पाणीपुरवठा

राज्यातील १४५२ गावे, ३३०१ वाड्यावस्ता आणि पाड्यांना सध्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. येथे सर्वसामान्यांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. राज्यात सध्या १८५८ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून सगळ्यात जास्त टँकर हे छ. संभाजीनगर जिल्ह्यात फिरत आहेत. येथे ४४३ टँकरने पाणी पुरवठा केला जात असून त्या खालोखाळ जालना, नाशिक, बीड, अहमदनगर, सातारा, पुणे, सांगलीमध्ये टँकरच्या फेऱ्या होत आहेत.

सर्वाधिक टँकर लागणारे जिल्हे

छ. संभाजी नगर - ४४३

जालना - ३२१

नाशिक - २२६

सातारा - १५७

सर्वाधिक टँकर लागणारे जिल्हे

बीड - ११७

अहमदनगर - ११०

पुणे -९८

सांगली -८७

जळगाव - ६८

धाराशिव - ६३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Solar Pump : सोलरही नाही अन् पैसेही परत मिळेना

Agriculture Scheme: शेतीसाठी यंत्र खरेदीवर कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ५०% अनुदान; ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घ्या

Cotton Crop Loss : अति पावसाने कपाशीचे पीक गेले हातातून

Jayakwadi Dam Water Release : ‘जायकवाडी’तून गोदावरीत ९४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग

Thailand-Cambodia War : आता थायलंड-कंबोडियात संघर्ष

SCROLL FOR NEXT