Amaravati News : ‘‘राज्यासह देशात भरडधान्यांना पुन्हा महत्त्व मिळत असून या पिकांच्या शाश्वत उत्पादनासाठी जैविक खतांसोबतच कीड, बुरशीनाशकांचा वापर वाढीस लागला आहे. .कोदा, कुटकी, सांवा, राळा आणि नाचणी, बाजरी आणि ज्वारी पिकांमध्ये जमीन आरोग्य जपत उत्पादन वाढवण्यासाठी जैविक व्यवस्थापन प्रभावी ठरत आहे,’’ असे मत कृषी विज्ञान केंद्र घातखेडचे तज्ज्ञ अमर तायडे यांनी व्यक्त केले..सकाळ-ॲग्रोवन तसेच आत्मा यांच्या संयुक्त सहकार्याने चार्कोदा (ता. धारणी) येथील संत गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात आयोजित ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.पंतप्रधान कृषी सिंचन योजनाअंतर्गंत पाणलोट विकास २.० मधील प्रवेश प्रेरक कार्यक्रमासाठी निवड करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचा यामध्ये सहभाग होता. .Organic Fertilizer : जैविक खतांचा वापरासाठी जाणीवजागृती करा .अध्यक्षस्थानी मेळघाट आदिवासी विकास संचालित शेतकरी कंपनीचे संचालक दिलीप जावरकर, तर पाहुणे म्हणून चार्कोदा गावचे उपसरपंच आडा पटेल होते. या वेळी बोलताना श्री. तायडे म्हणाले, की जैविक खतांचा योग्य वापर केल्याने मातीची सुपीकता व पोषकतत्त्वांची उपलब्धता वाढते. .Organic Fertilizer Production: कणकवलीत सहा टन निर्माल्यापासून खत निर्मिती.ॲझाटोबॅक्टर, पीएसबी, ॲझोस्पिरिलम, पोटॅश, मोबिलायझिंग बॅक्टेरिया सारखी जैवखते पिकांना नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅश नैसर्गिक स्वरुपात उपलब्ध करून देतात. सेंद्रिय खतांपैकी शेणखत, वर्मी कंपोस्ट जीवामृत आणि घनजीवामृत यांचा वापर केल्यास मातीतील सेंद्रिय कार्बन वाढतो आणि उत्पादनक्षमतेत १५ ते २० टक्के वाढ होते..कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग संयुक्तरित्या जैविक शेतीचा प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील असून भरड धान्याचे उत्पादन व उत्पन्न वाढवण्यास हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘ॲग्रोवन’चे वितरण प्रतिनिधी सचिन शेगोकर यांनी प्रास्ताविक केले. आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रमोद दुबे यांनी शेतमालाचे मूल्यवर्धन, तर सहाय्यक कृषी अकिधारी गजानन कोरे यांनी विविध योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन आत्माचे राजेश अडगोकर यांनी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.