Dhule Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Dhule Water Shortage : धुळे जिल्ह्यात जलसाठा घटू लागला

Dhule Water Project : धुळे जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पांत केवळ २० टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी या काळात २३ टक्के जलसाठा होता.

Team Agrowon

Dhule Water News : धुळे जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पांत केवळ २० टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी या काळात २३ टक्के जलसाठा होता. अक्कलपाडा प्रकल्पातही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३.०४ टक्के जलसाठा कमी झाला आहे. अनेक लघू प्रकल्पांतही जलपातळी घटल्याने पाऊस लांबल्यास चिंता वाढणार आहे. त्यामुळे पाण्याची बचत आवश्यक आहे.

अर्थात, टंचाई निवारणासाठी विविध प्रकल्पांतून पाणी सोडले आहे, त्यामुळे देखील या प्रकल्पांतील पाणीसाठ्यात घट झाल्याचे दिसते. दरम्यान, सुलवाडेत दोन टक्के, करवंदमध्ये ५.०४, तर सोनवद प्रकल्पांत यंदा तुलनेने १०.१७ टक्के जलसाठा अधिक आहे.

मृग नक्षत्र तोंडावर आहे. संपूर्ण उन्हाळ्यात तापमानाचा पारा ४० वर राहिल्याने बाष्पीभवनही वाढले. या वर्षी मे हीटचा तडाखा सर्वाधिक राहिला. ४४.५ अंश सेल्सिअसपर्यंत पारा गेल्याने जिवाची लाहीलाही झाली. जूनमध्ये तापमानाचा ३९, ४०, ४१ अंश सेल्सिअस दरम्यान आहे.

या तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याचा वापर व बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील जलस्रोतांमधील पाण्याची पातळीही कमी झाली आहे. पावसाळा लांबल्यास उपलब्ध पाण्यावरच तहान भागवावी लागणार आहे. १२ मध्यम प्रकल्प आणि ४७ लघू प्रकल्पांत सध्या २२.४४ टक्के जलसाठा आहे.

मागील वर्षी तो २७ टक्के होता. १२ मध्यम प्रकल्पांत २२.५१ टक्के, तर ४७ लघू प्रकल्पांत २२.२२ टक्के जलसाठा आहे. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाणे तलावात २८.९५ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी या काळात नकाणे तलावात ४४.२६ टक्के जलसाठा होता.

प्रकल्पनिहाय जलसाठा असा (टक्क्यांत)

प्रकल्प- शिल्लक साठा - मागील वर्षाची स्थिती

सुलवाडे - ३६.६४ - ३४.६४

अनेर - ३२- ४०.३१

करवंद - २९.३ -२३.९९

मालनगाव - २०.६५- ३१.६९

बुराई - १९.७०- २२.०३

अक्कलपाडा - १८.३० - २१.३४

जामखेडी - १८.२३ - २०.१९

अमरावती - १७.३९- ३४.२१

सोनवद - १४.२८ - ४.११

वाडीशेवाडी -१३.११ - ४४.१०

लाटीपाडा - १२.१८ - २९.३४

कनोली - ६.२७ - ७.१०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT