Satara Water News : नांदवळच्‍या धरणात पाणी सोडण्‍याची मागणी

Water Shortage : उत्तर कोरेगावातील पाणीटंचाईचे सावट दूर करण्यासाठी वसना उपसा जलसिंचन योजनेचे पाणी नांदवळच्या धरणात सोडून वसना नदीवरील बंधारे भरावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
Satara Water News
Satara Water NewsAgrowon
Published on
Updated on

Water Satara News : उत्तर कोरेगावातील पाणीटंचाईचे सावट दूर करण्यासाठी वसना उपसा जलसिंचन योजनेचे पाणी नांदवळच्या धरणात सोडून वसना नदीवरील बंधारे भरावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Satara Water News
Water Shortage : जळगाव जिल्ह्यातील चार तालुक्यांत पाणीपातळी अर्धा मीटरने घटली

यंदा या परिसराला वळीव पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे उन्हाळा पूर्णतः कोरडा गेला. मॉन्सूनचे आगमन जवळ आले असूनही उत्तर कोरेगावला अद्याप दमदार पाऊस न पडल्याने विहिरी व बोअरवेलचे पाणी संपले आहे. त्यामुळे सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे.

टंचाई काळात टँकरने पाणीपुरवठा करणे ही तात्पुरती उपाययोजना असून, टँकरची गरजच पडणार नाही, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पिंपोड्यासह नांदवळ, सोळशी, नायगाव, सोनके या गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरी धरणक्षेत्रात आहेत.

पाणी विनामूल्‍य देण्‍याची मागणी

यंदा अल निनो कार्यरत असल्यामुळे मॉन्सूनच्या पावसाबाबत साशंकता व्यक्त होत आहे. त्यामुळे आत्ता पाणी सोडण्याची आवश्यकता आहे. मात्र, ही उपसा सिंचन योजना असल्याने शेतकऱ्यांकडून आधी पैसे अथवा चेक घेतला जातो. यंदा शेतकरी अडचणीत असल्याने विनामूल्य पाणी सोडले जावे, अशी मागणी होत आहे.

नांदवळ धरणात रात्रंदिवस बेकायदेशीर पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे सध्या केवळ मृत पाणीसाठा शिल्लक आहे. हिरवे झालेले पाणी नागरिकांना वापरावे लागत असल्याने आरोग्याच्या समस्या बळावत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com