Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : खानदेशात पाणई टंचाई कमी राहणार

Water Storage : खानदेशात यंदा टंचाई कमी राहणार आहे. अनेक सिंचन प्रकल्पांत जलसाठा सध्या मुबलक आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा टंचाई कमी राहणार आहे. अनेक सिंचन प्रकल्पांत जलसाठा सध्या मुबलक आहे. मागील वर्षी खानदेशात नंदुरबारात २०, धुळ्यात १९ टक्के पाऊस कमी होता. जळगाव जिल्ह्यातही आठ टक्के कमी पाऊस झाला. फेब्रुवारी महिन्यात टंचाई जाणवू लागली होती. नदीपात्रात प्रकल्पांतून पाणी सोडून टंचाई दूर करण्याची मागणी केली जात होती.

धुळ्यात टंचाई अधिक होती. पांझरा प्रकल्पाचे पाणी नदीत सोडून साक्री, धुळे, अमळनेरातील टंचाई दूर करण्याची मागणी करण्यात आली होती. गिरणा नदीतूनही तीन वेळेस नदीत पाणी सोडण्यात आले. खानदेशात सातपुड्यातही कमी पाऊस होता. धुळ्यात वर्षभरात ५६५ मिलिमीटर पाऊस पडतो.

नंदुरबारात ८५४ मिलिमीटर दर जळगाव जिल्ह्यात ६३२ मिलिमीटर पाऊसमान आहे. काही भागांत चांगला पाऊस झाला, पण काही भागात पाऊसमान कमी राहीले. सातपुडा पर्वत भागातील १०० पेक्षा अधिक गावे, पाड्यांवर टंचाई जाणवू लागली होती. कारण पर्वतातील पाणी नाले, नद्यांतून वाहून जाते.

नंदुरबारातील सात गावांत सध्या टंचाई अधिक असून टँकरची गरज होती. ऑगस्टमध्येही टँकर काही भागात सुरू होते. धुळ्यातही सुमारे ११ गावांत टंचाई स्थिती जुलैपर्यंत गंभीर होती. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, पारोळा, बोदवड, धुळ्यातील साक्री, शिंदखेडा व नंदुरबारातील नंदुरबार तालुक्यात समस्या बिकट बनली होती. आवश्यकतेनुसार टंचाई आराखड्यातील तरतुदीत बदल, वाढ करण्यात आली.

जळगावसह धुळे, नंदुरबारातील सर्वच प्रकल्पांतील जलसाठाही फेब्रुवारीतच घटला. जळगावमधील वाघूर, हतनूर व गिरणा धरणांतील साठा कमी होता. परंतु यंदा जलसाठा अजूनही सर्वच प्रकल्पांत मुबलक आहे. खानदेशातील एकूण जलसाठा अजूनही ८० टक्के एवढा आहे.

जळगाव जिल्ह्यातील तोंडापूर, अग्नावती, बोरी, मन्याड, अंजनी, मोर, गूळ, अभोडा, सुकी, मंगरूळ, हतनूर हे प्रकल्प १०० टक्के भरले होते. तसेच धुळ्यातील पांझरा, मालनगाव, अमरावती, बुराई, जामखेली, अनेर, नंदुरबारातील दरा, चिरडे, देहली, सुसरी या प्रकल्पांतही १०० टक्के जलसाठा होता. यामुळे यंदा टंचाई अनेक गावांत नसणार आहे.

गिरणातील जलसाठा मुबलक

जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गिरणा नदीवरील चाळीसगावनजीकच्या गिरणा धरणातील जलसाठा यंदा १०० टक्के होता. या धरणाची साठवण क्षमता १८ टीएमनसी असून, यंदा हे धरण फक्त ऑगस्टअखेरीस १०० टक्के भरले होते.

मागील पावसाळ्यात त्यात ५६ टक्केच जलसाठा होता. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, धरणगाव, एरंडोल या तालुक्यांना त्याचा मोठा लाभ होतो. २१ हजार हेक्टरवरील रब्बीसही त्यातून पाणी दिले जाणार आहे. तसेच टंचाई दूर करण्यासाठी नदीत तीन वेळेस आवर्तन सोडण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT