Water Scarcity : जळगावातील ५२७ गावांत पाणीटंचाई

Water Shortage : यंदा सुमारे १४० टक्के पाऊस झालेला आहे. त्यामुळे आगामी येणाऱ्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी चिन्हे दिसून येत होती.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यात यंदा सुमारे १४० टक्के पाऊस झालेला आहे. त्यामुळे आगामी येणाऱ्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी चिन्हे दिसून येत होती. परंतु, असे असले तरीदेखील जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून यंदा ५२७ गावांत पाणीटंचाई होईल, असा अंदाज वर्तवीत तब्बल दहा कोटी १५ लाख रुपयांचा पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात आलेला होता. मात्र, जिल्हा शासनाने त्यात तीन कोटी रुपयांची कपात करीत केवळ सात कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या योजनांचे काम सुरू आहे. त्यामधील काही कामे आता पूर्णत्वास येत आहेत. परतीचा पाऊसदेखील चांगला झाला असल्याने यंदा पाणीटंचाईची दाहकता कमी असेल, असा अंदाज ग्रामीण पाणीपरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे.

Water Scarcity
Water Shortage : खानदेशात पाणी टंचाई आराखड्यावरील तरतूद यंदा कमी

त्यामुळेदेखील यंदा जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या आराखड्याला कात्री लागली असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हाभरात पाणीपुरवठा विभागाच्या अंतर्गत जलजीवन मिशनची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. आगामी वर्षात जिल्हा पाणीटंचाईमुक्त होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी व उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून टंचाई आराखड्याचे काम हाती घेण्यात आलेले होते. यंदा टंचाईच्या आराखड्यात जिल्ह्यातील ५२७ गावे संभाव्य पाणीटंचाईत नोंदविण्यात आलेली आहेत.

उपाययोजना म्हणून या गावांसाठी टँकर व विहिरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. कुपनलिका, विंधन विहिरी आदी बाबींवर खर्च करण्यासाठी दोन कोटी ५७ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. दरम्यान, पाऊस कमी झाल्यास जिल्ह्यातील अनेक गावांना विशेषतः उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र, यंदा चांगला पाऊस झालााय तरी देखील ५२७ गावांत पाणी टंचाई झळा सहन कराव्या लागणार आहेत.

Water Scarcity
Water Shortage : अमरावती जिल्ह्यात आतापासूनच पाणीटंचाईची चाहूल

तालुकानिहाय संभाव्य टंचाईची गावे

येत्या २०२५मधील मार्चदरम्यान जिल्ह्यातील १२४ गावांमध्ये संभाव्य टंचाई होईल, असा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ३७ विहिरी व कूपनलिका प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी साधारणतः ५२ लाख रुपयांच्या निधची तरतूद आराखड्यात करण्यात आलेली आहे.

सोबतच २७ टँकर व ७३ विहिरी अधिग्रहित करण्यासाठी निधीची तरतूद आराखड्यात करण्यात आलेली आहे. अमळनेर तालुक्यात ३३, भडगाव व भुसावळ तालुक्यांत प्रत्येकी तीन गावे, चोपडा १५, धरणगाव १४, जळगाव आठ गावे तर सर्वाधिक जामनेर तालुक्यातील ३६ गावे टंचाईग्रस्त असतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यात यंदा पाऊस चांगला झाल्याने पाणीटंचाईची गावे कमी झालेली आहेत. पहिल्या टप्प्यात येत्या जानेवारीपर्यंत कोठे पाणीटंचाईची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे टंचाई आराखड्याची तरतूद कमी झालेली आहे. अतिपाणीटंचाई मे महिन्यामध्ये जाणवते. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आलेले आहे.
- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com