Water Scarcity Nandurbar Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : पुणे विभागात नोव्हेंबरमध्येच पाणीटंचाईला सुरुवात

Drought Update : चालू वर्षी पावसाळ्यात अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच नोव्हेंबर महिन्यातच पाणीटंचाई भासत आहे.

Team Agrowon

Pune News : चालू वर्षी पावसाळ्यात अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच नोव्हेंबर महिन्यातच पाणीटंचाई भासत आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, आणि सोलापूर या जिल्ह्यांत पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुणे विभागात अजूनही ११३ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. येत्या काळात टंचाईच्या झळा आणखी तीव्र होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मे महिन्यात पुणे विभागात ५१ टॅँकरने ६२ गावांमधील १५ हजार ७८३ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होऊन होता. पावसाळ्यात यामध्ये वाढ होऊन १६७ टॅकरने १५२ गावे व ९४० वाड्या-वस्त्यांमधील ३ लाख ४ हजार नागरिकांना टॅकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पुरेसा पाऊस न पडल्याने टँकरच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या वर्षी विभागात या काळात एकही टॅँकर सुरू नव्हता. परंतु चालू वर्षी पाण्याचे भीषण संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

यंदा मॉन्सूनचे काही प्रमाणात उशिराने आगमन झाले. लांबलेल्या पावसामुळे त्याचा परिणाम शेतीसह पिण्याच्या पाण्यावर सद्धा झाला आहे. जुलै अखेरीस तसेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे धरणे जेमतेम भरली.

त्यानंतर सप्टेंबरमध्ये खंड पडला असून सप्टेंबरच्या अखेरीस काही प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे पाणीपातळी वाढली नसल्याने अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विभागात सातारा जिल्ह्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत. त्यापाठोपाठ सांगली जिल्ह्यात ३३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

पुणे विभागातील टँकरची स्थिती

जिल्हा गावांची संख्या वाड्या-वस्त्या टँकरची संख्या

पुणे १० ६१ १२

सातारा ६४ २६८ ६४

सांगली ३२ २७१ ३३

सोलापूर ४ ३५ ४

एकूण ११० ६३५ ११३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT