Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : संभाव्य टंचाई आराखडा तीन कोटींचा

Water Shortage Plan : पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने दोन कोटी ९९ लाख ६८ हजार रुपयांच्या संभाव्य पाणीटंचाईच्या कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे

Team Agrowon

Yavatmal News : जिल्ह्यात जानेवारी ते जून या कालावधीत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने दोन कोटी ९९ लाख ६८ हजार रुपयांच्या संभाव्य पाणीटंचाईच्या कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. यात साडेतीनशे खासगी विहिरी अधिग्रहणासोबत २९ टँकर प्रस्तावित करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. जिल्ह्यातील प्रकल्पात बऱ्यापैकी जलसाठा आहे. यानंतरही उन्हाळ्यात अनेक भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी जिल्हाधिकारी डॉ. पकंज आशिया यांच्याकडे पाठविला होता. प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. पाणीपुरवठा विभागाने जानेवारी ते मार्च महिन्याच्या कालावधीसाठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे.

यात १३० खासगी विहिरी अधिग्रहण, सात टँकर, तर चार गावातील नळ योजना विशेष दुरस्तीचे प्रस्ताव तयार करण्यात आला आहेत. एप्रिल ते जून कालावधीत २६१ खासगी विहिरी, आणि २२ टँकर लागण्याची शक्यता आहे.

जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत नळ योजना विशेष दुरुस्ती, खासगी विहिरी अधिग्रहण आणि टँकर अशा मिळून ३५२ गावांत जवळपास ४०२ उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत. यासाठी दोन कोटी ९९ लाख ६८ हजार रुपयांच्या संभाव्य कृती आराखडा मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देऊन विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

२९ टँकरने पाणीपुरवठा

एप्रिल ते मे महिन्यात तापमानात वाढ होते. यावेळेतच नदी, नाले, ओढ्यातील पाणीपातळी कमी होते. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होते. या कालावधीत नागरिकांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. जानेवारी ते मार्च या कालावधीत सात टँकर अपेक्षित आहेत. एप्रिल ते जून या कालावधीत २२, असे मिळून यंदा २९ टँकर लागण्याची शक्यता संभाव्य पाणी टंचाईच्या कृती आराखड्यात प्रस्तावित केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त, कृषिमंत्र्यांची माहिती

Ujni Dam Water : उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!

Agriculture Subsidy: कोल्हापुरात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ४६४ लाभार्थ्यांना अनुदान

Okra Pest Attack: भेंडीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण

E-Pik Pahani : पीक पाहणीसाठी पैसे; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT