Jalgaon News : जिल्ह्यात यंदा कमी झालेल्या पावसामुळे सुमारे ५९२ गावांत पाणीटंचाईच्या झळा जाणवणार आहेत. जिल्हा प्रशासन ‘अलर्ट मोड’वर असून, ५९२ ठिकाणी उपाययोजना करण्यास सुमारे नऊ कोटी ९० लाख ७६ हजारांचा पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे.
सध्या १२ गावांत १३ टँकर सुरू आहेत. त्यात चाळीसगाव तालुक्यातील विसापूर तांडा, अंधारी, करजगाव, हातगाव, हिरापूर, तमगव्हाण, रोहिणी, राजदेहरे, ब्राह्मण शेवगे, घोडेगाव, हातगाव भिल्लवस्ती या गावांचा समावेश आहे.
यावर्षी जूनच्या अखेरीस उशिराने पाऊस सुरू झाला. जुलैमध्ये चांगल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या झाल्या. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने पेरण्या वाया जाण्याची भीती निर्माण झाली. सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले. पण उत्पादनात कमालीची घट झाली.
बागायती कापसाचे उत्पादन आले. मात्र, कोरडवाहू कापसाचे उत्पादन घटले. सप्टेंबर, ऑक्टोबरमधील पावसाने हतनूर, वाघूर, गिरणा धरणात चांगला पाणीसाठा झाला. हतनूर ९० टक्के, तर वाघूर शंभर टक्के भरले. त्यामुळे भुसावळ परिसरातील यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, जामनेर, जळगाव तालुक्यातील पाणीटंचाई मिटण्यास मदत झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.