Farming Crisis : सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने रब्बी पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेवर करता आली नाहीत. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ ५ टक्केच रब्बी पेरण्या झाल्या आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. .कृषी विभागाच्या २१ ऑक्टोबर २०२६ अखेरच्या अहवालानुसार, जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख १३ हजार २१० हेक्टर आहे. त्यापैकी आजअखेर केवळ १० हजार ६०४ हेक्टरवर म्हणजेच अवघ्या ५ टक्के क्षेत्रावरच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत..Vanraj Agri Tourism Centre: शेरकर दांपत्याचे नावारूपाला आलेले वनराज कृषी पर्यटन केंद्र.थंडीची चाहुल नसल्याने गहू, हरभरा पिकांची पेरणी सुरवात झालेली नाही. गहू आणि इतर तृणधान्याची पेरणी नगण्य आहे. हरभऱ्यासह कडधान्यांचे सरासरी क्षेत्र २९ हजार ५०७ हेक्टर असताना केवळ १७७ हेक्टरवर (१ टक्के) पेरणी शक्य झाली आहे..Agri Machinery : ट्रॅक्टरचलित बंदिस्त वाफे यंत्राचे प्रात्यक्षिक .गळीतधान्यांचे सरासरी ३८० हेक्टर क्षेत्र असून अद्याप जिल्ह्यात करडई, सूर्यफूल, तीळ किंवा जवस या तेलबियांची पेरणी शून्य टक्क्यांवरच अडकली आहे..पश्चिम भाग निरंक !तालुकानिहाय आकडेवारी पाहता, खटाव तालुक्यात सर्वाधिक ६ हजार १३३ हेक्टरवर (२१ टक्के) पेरणी झाली असून माण तालुक्यात ४ हजार ०१७ हेक्टरवर (९ टक्के) क्षेत्र पेरणीखाली आले आहे. फलटण तालुक्यात ३०४ हेक्टर (१ टक्के), साताऱ्यात ४३ हेक्टर, वाईत १७ हेक्टर, खंडोळ्यात ६ हेक्टर आणि कोरेगाव तालुक्यात अवघ्या ४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जावली, पाटण, कराड आणि महाबळेश्वर तालुक्यांत अद्याप रब्बीची पेरणी सुरू झालेली नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.