Water Tanker Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्र

Water Crisis : येत्या काळात पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Team Agrowon

Pune News : उन्हाची तीव्रता वाढत असताना पाणीटंचाई तीव्र होऊ लागली आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढू लागली आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांत अचानक टँकरची संख्या वाढली आहे. सध्या २७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काळात पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चालू वर्षी पावसाळ्यात अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, दौंड, शिरूर, इंदापूर, खेड तालुक्यांत पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. सध्या १७ गावे व १५९ वाड्या वस्त्यांवर २७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

यामध्ये ९ शासकीय टँकरचा, तर १८ खासगी टँकरचा समावेश आहे. प्रामुख्याने ही सर्व टँकर पुरंदर आणि बारामती भागातील गावांमध्ये आहे. गेल्या आठवड्यात १६ टँकरने १९ गावे व १३८ वाड्यावस्त्यांतील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. गेल्यावर्षी याच काळात टँकर सुरू झालेले नव्हते.

यंदाही गेल्या वर्षीच्या टँकरची संख्या वेगाने वाढलेली दिसून येत असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षी लांबलेल्या पावसामुळे त्याचा परिणाम शेतीसह पिण्याचा पाण्यावर सुद्धा झाला आहे. जुलै अखेरीस तसेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे धरणे जेमतेम भरली.

त्यानंतर सप्टेंबरमध्ये खंड पडला असून, सप्टेंबरच्या अखेरीस काही प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे पाणीपातळी वाढली नसल्याने अनेक गावांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रामुख्याने पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी होते.

त्यामुळे या भागात सर्व भिस्त टँकरवर अवलंबून होती. पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. प्रामुख्याने पुरंदरमधील राजुरी, रिसे पिसे या गावात पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र आता टंचाईची समस्या अधिक आहे.

आमच्याकडे ३० ते ४० एकर शेती आहे. पाण्यासाठी दोन ते तीन विहिरी आहेत. चालू वर्षी पाऊस कमी होती. त्यामुळे सध्या पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. थोडे फार होते म्हणून पिके बरी होती. आता कमी पडण्यास सुरुवात झाली असून पुढील महिन्यापासून टँकरचे पाणी घ्यावे लागेल.
संजय गाडेकर, साबळेवाडी, बारामती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: राज्यात जोरदार पावसाचा अंदाज; विदर्भ, कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता

Banana Karpa Disease: केळीवरील करपा रोगाचे व्यवस्थापन

UPI Rule: यूपीआयच्या नियमात झाले मोठे बदल; फसवणूक टाळण्यासाठी सुधारणा

HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी; HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत वाढली!

Heavy Rain Update : बार्शी तालुक्यात अतिवृष्टीने शेतीपिकांचं नुकसान; खासदार ओम राजेनिंबाळकरांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

SCROLL FOR NEXT