Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : अपेक्षित असलेल्या गावांपेक्षा कमी अपेक्षित गावात पाणीटंचाई

IAS Ayush Prasad : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जानेवारीपासूनच पालिकांना पाणी पुरवठा कपातीचे आदेश दिल्याने पाणी टंचाईची गावे वाढली नाहीत.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्याने पाणी टंचाईच्या जानेवारी ते मार्च या दुसऱ्या टप्प्यात १४९ गावात संभाव्य पाणी टंचाई जाणवेल. असा अंदाज होता. मात्र, सध्या २९ गावातच पाणी टंचाई चित्र आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जानेवारीपासूनच पालिकांना पाणी पुरवठा कपातीचे आदेश दिल्याने पाणी टंचाईची गावे वाढली नाहीत, असा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे.

उद्या सोमवारपासून (ता.१) पाणी टंचाईचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. त्यात ३९६ गावे टंचाई ग्रस्त असतील, असा अंदाज आहे. पाणी टंचाई घालवून विविध उपाय योजनांसाठी ५ कोटी २० लाख ९४ हजारांचा आराखडा तयार आहे. येत्या तीन महिन्यात शंभरवर गावांना टंचाई जाणवणार नाही. मात्र तापमान ४५ अंशापुढे गेल्यास भूगर्भातील पाणी पातळी खालवण्याचा अंदाज आहे.

अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात सुमारे ५९२ गावात पाणी टंचाईच्या झळा जाणवतील असा अंदाज ‘आक्टोबर २०२३’ मध्ये वर्तविला होता. टंचाई निवारण्यासाठी ९ कोटी ९० लाख ७६ हजारांचा आराखडा तयार आहे.‘अलनिनो’च्या इफेक्टमुळे एप्रिल २०२३’ महिन्यात पाउस झाला. मेमध्ये तापमानाने उच्चांक गाठला.

दरवर्षी सात जूनला सुरू होणारा पाउस जूनच्या अखेरीस उशिराने सुरू झाला. तब्बल एक महिना पावसाची प्रतिक्षा करावी लागली. जूलैमध्ये चांगला पावसाने खरिपाच्या पेरण्या झाल्या. मात्र ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिली पण सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले.

सप्टेंबर, आक्टोबर मधील पावसाने हतनूर, वाघूर, गिरणा धरणात चांगला पाणी साठा झाला. हतनूर ९० टक्के तर वाघूर शंभर टक्के भरले होते. यामुळे भुसावळ परिसरातील यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, जामनेर, जळगाव तालुक्यातील पाणी टंचाई मिटण्यास मदत झाली होती.

असे असले तरी चाळीसगाव तालुक्यात अतिशय कमी पाउस झाल्याने हा तालुका दुष्काळी जाहीर झाला आहे. चाळीसगाव, भडगाव, अमळनेर, पारोळा याठिकाणी टंचाईच्या झळा सूरू झाल्या.

टॅंकर सुरू असलेले गाव

सध्या २९ गावात ३३ टँकर सुरू आहेत. चाळीसगाव (२२ गावे) विसापूर तांडा, अंधारी, करजगाव, हातगाव, हिरापूर, तमगव्हाण, रोहिणी, राजदेहरे, ब्राहमण शेवगे, घोडेगाव, हातगाव भिल्लवस्ती या गावांचा समावेश आहे.

टंचाईग्रस्त वाड्या

भडगाव : १गावे-तळबंद तांडा

अमळनेर : ५ गावे-तळवाडे, शिरसाळे, निसडी, लोणपंचम, नगाव बुद्रूक.

पारोळा : १-खेडीढोक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT