Water Shortage Kolhapur : लोकसभेच्या तोंडावर कोल्हापूर जिल्ह्यात पाणी टंचाई, नेते लक्ष घालणार का?

Panchganga River Dry : पंचगंगा नदीचे पात्र जिल्ह्यातील अनेक तालुक्यात कोरडे पडत असल्याचे चित्र आहे.
Water Shortage Kolhapur
Water Shortage Kolhapuragrowon
Published on
Updated on

Kolhapur Drought Condition : कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पंचगंगा नदीचे पात्र कोरडे पडत असल्याने पिण्याच्या पाण्यासह रबी पिकांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीचे पात्र जिल्ह्यातील अनेक तालुक्यात कोरडे पडत असल्याचे चित्र आहे. मागच्या वर्षी कमी झालेला पाऊस आणि अशातच यंदाचा कडक उन्हाळ्यामुळे पाणीटंचाईमुळे पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

हातकणंगले, शिरोळ तालुक्यात कृष्णा, वारणा, दूधगंगा, पंचगंगा या चार नद्यांना कायम पाणी असते, परंतु यंदा नद्यांच्या पाणीपातळी डिसेंबरपासूनच घटली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये भीषण पाणीटंचाईचे चिन्हे दिसू लागली आहेत. शिरोळ तालुक्याच्या अनेक गावांत मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकविला जातो. भाजीपाल्यांसह उसाला सातत्याने पाण्याची गरज भासते. मात्र, नदीपात्र कोरडे पडल्याने धरणातून पाणी सोडणे हा एकमेव उपाय आहे.

ऊस हंगाम सुरू झाल्यानंतर आठवडाभर अवकाळीने जोरदार हजेरी लावली. शेतामध्ये महिनाभर पाणी साचून राहिले. याचा परिणाम ऊस तोडीवर झाला होता. नंतरच्या काळात वाढते तापमान आणि गतवर्षी पावसाचे झालेले कमी प्रमाण यामुळे सध्या नदीपत्रांमध्ये दगड-गोटे दिसू लागले आहेत.

शिरोळ येथील बंधारा परिसरातील नदीपात्र कोरडे पडले होते. त्यामुळे कृष्णा नदीचे बॅकवॉटर पंचगंगेच्या पात्रात सुरू झाल्याने काही प्रमाणात पाणी उपलब्ध होत होते. मात्र, कृष्णेच्या पाणीपातळीतही घट होत असल्याने यावरही मर्यादा येणार आहेत. तालुक्यातील चारही नद्यांमध्ये पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर घट होत असल्याने उभ्या पिकांची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.

पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन माळरानावरील शेतकऱ्यांकडून उभा ऊस चाऱ्यासाठी विक्री करण्याचा सपाटा सुरू आहे. पाण्याअभावी पिके हातची जाण्यापेक्षा हिरवागार ऊस चाऱ्याला विक्री करून दोन पैसे मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

Water Shortage Kolhapur
Sangli Drought Condition : २०११ च्या जनगणनेनुसार दुष्काळी भागात पाणी पुरवठा, मंत्री दखल घेणार का?

निवडणुकीच्या धामधुमीत प्रश्न दुर्लक्षित नको

सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. सर्वच पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीत लागले आहेत. अशा स्थितीत तालुक्यात पाण्याअभावी पिके धोक्यात आली असून, याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होऊ नये, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

पिण्याच्या पाण्याचेही संकट

शिरोळ तालुक्यातील बारमाही वाहणाऱ्या नद्या सध्या कोरड्या पडल्या असून आणखी काही दिवस अशी स्थिती राहिल्यास लवकरच तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपाययोजनेची गरज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com