Dharashiv News : पावसाचे प्रमाण घटल्याने यंदा अवर्षणस्थितीमुळे शेत शिवारातीत पीकाची स्थिती नाजुक झाली आहे. नगदी पिक म्हणुन ऊस पिकाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला होता मात्र गेल्या दोन वर्षापासून परिस्थिती बदलेली आहे. यंदा तर पाण्याचे स्रोत बंद पडल्याने तालुक्यातील ५० टक्क्यापेक्षा अधिक क्षेत्रातील ऊस पिक मोडीत काढले आहेत.
तालुक्यात कोरडवाहू जमिनीचे क्षेत्र अधिक आहे. शेत जमिन ओलीताखाली यावी, या हेतूने जवळपास ३२ सिंचन प्रकल्पाची निर्मिती झालेली आहे. मात्र पाच - सात वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने प्रकल्पात पाणीसाठा तात्पुरत्या स्वरूपाच उपलब्ध होत आहे. दोन वर्षांत तर पाण्याची स्थिती नाजुकच झाली आहे.
गत पावसाळ्यात पाऊस अगदी कमी झाल्याने पाण्याचे स्त्रोत बंद पडताहेत. पाणी पातळी खोलवर गेल्याने पाण्याच्या उपलब्धतेसाठी शेतकऱ्यांना नाना तऱ्हेच्या उपाययोजना कराव्या लागत आहेत. यंदा तर हिवाळ्यातच प्रकल्पातील पाण्याने तळ गाठला होता. फेब्रूवारी महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची दाहकता सुरु झाली आहे.
२६ कुपनलिका, पाच विहिरी कोरड्या
तालुक्यातील बलसुर येथील जयराज पटवारी यांच्या शेतातील २७ कुपनलिका पैकी २६ कुपनलिकेचे पाणी बंद झाले आहे तर पाचही विहिरी कोरड्या पडल्याने गेल्या दहा वर्षापासुन जवळपास ४० एकर ऊसाचे क्षेत्र यंदा पहिल्यांदाच मोडीत काढावे लागले आहे. सद्यस्थितीत फक्त दिड एकर क्षेत्रात ऊस आहे तर पाच एकर क्षेत्रात चिंच व आंब्याची फळबाग आहे. एका कुपनलिकेतुन उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर कसेबसे फळबाग जीवंत ठेवण्याचा प्रयत्न श्री. पटवारी करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.