Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : नदीकाठावरील धामणगावात भीषण पाणीटंचाई

Water Shortage : जवळगाव धरण उशाला असूनही नागझरी नदीकाठी असलेले सुमारे सव्वाचार हजार लोकसंख्येचे तीर्थक्षेत्र धामणगाव दुमाला येथील ग्रामस्थांना महिनाभरापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे.

Team Agrowon

Nashik News : जवळगाव धरण उशाला असूनही नागझरी नदीकाठी असलेले सुमारे सव्वाचार हजार लोकसंख्येचे तीर्थक्षेत्र धामणगाव दुमाला येथील ग्रामस्थांना महिनाभरापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे.

आठ-दहा दिवसांआड पाणी येत असल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली असून, काहींचा शेतात राहण्याकडे कल दिसून येत आहे. त्यामुळे निम्मा उन्हाळा बाकी असताना पाणीटंचाईचा मुकाबला प्रशासन व ग्रामस्थांना करावा लागणार आहे.

धाकली पंढरी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले श्री संत माणकोजी बोधले महाराज यांचे धार्मिक तीर्थक्षेत्र असलेले बार्शी तालुक्यातील धामणगाव दुमाला हे चार हजार २६८ लोकसंख्येचे गाव. यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीपातळी खाली गेल्याने ग्रामपंचायतीला सध्या आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागत आहे.

जनावरांसाठी चारा उपलब्ध आहे, परंतु पाणी विकत घ्यावे लागत आहे. कधी-कधी भारनियमनामुळे वीज गेल्यावर पाणीपुरवठा विस्कळित होत आहे. प्रशासनाने तत्काळ दखल घेत पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत धामणगाव ग्रामपंचायतीच्या विहिरीचे खोलीकरण मंजूर केले असून, खासगी विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव लवकरच मंजूर करण्यात येईल. गावाच्या लोकसंख्येनुसार एक किंवा त्यापेक्षा अधिक विहिरी अधिग्रहण केली जातात.
अजित वाघमारे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, बार्शी
पाच दिवसांपूर्वी पाणीटंचाईचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला आहे. विहीर अधिग्रहण अद्याप मंजूर नाही. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विहीर खोलीकरण करणार असून, नवीन इंधन विहीर देखील घेण्याचा विचार आहे. गावातील बोगस नळ कनेक्शन कट करणार आहोत. पाणीटंचाईवर लवकरच उपाययोजना करण्यात येईल.
एस. के. पाटील, सरपंच, धामणगाव दु.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: मका बाजार दबावातच; कापूस भाव टिकून, सोयाबीन तेजीत, हळदीचे भाव टिकून तर ज्वारी आवक सुधारली

Jaltara Works: धाराशिवमध्ये एक लाख जलताराचा निर्धार

Ambadi Flower Juice: अंबाडीच्या फुलांचे सरबत

Agriculture Fund: ‘कृषी’च्या निधीत भरीव वाढ करावी

Maharashtra Weather Forecast : विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT