Water Scarcity : जुन्नर तालुक्यात नऊ टँकरने पाणीपुरवठा

Water Crisis : जुन्नर तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागात तसेच पूर्व भागात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी होऊ लागली आहे.
Water Scarcity
Water Scarcity Agrowon

Pune News : जुन्नर तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागात तसेच पूर्व भागात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी होऊ लागली आहे. पंचायत समितीकडे टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी एकूण १८ गावे व परिसरातील अनेक वाड्या वस्त्यांकडून प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

यापैकी १६ प्रस्ताव मंजूर झाले असून आंबे आणि सोनावळे येथील प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या ९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून टँकर उपलब्ध होताच लवकरच उर्वरित सात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी व सहायक गटविकास अधिकारी नीलेश बुधवंत यांनी दिली.

Water Scarcity
Water Scarcity : टंचाईग्रस्त दहा गावांसाठी आठ विहिरी अधिग्रहित

यावर्षी २८ मार्चपासून शिंदेवाडी गावठाण तसेच उक्तावस्ती, गणपीरवस्ती, शिंदेवाडी, व्हरंडी, दमडी, रामवाडी, कापूरवाडी, येथील २ हजार ३० लोकसंख्येला दोन खेपा तसेच पेमदरा गावठाण व मळा, टिटेवाडी, खटकाळी, भोसलेवाडी, कारवाडी, लवणवस्ती, ठाकरवस्ती येथील २ हजार ४५० लोकसंख्येला ३ खेपांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

गोद्रे गावच्या उतळेवाडी, भोजनेवाडी, कपाटवाडी, वडाचामाळ, ठाकरवाडी, रामकरवस्ती, सुरकुलवाडी येथील १ हजार ५५ लोकसंख्येला दोन खेपा तसेच मांडवे गावच्या पुताचीवाडी, गुडघेवाडी, शेलाचामाळ, तळपेवस्ती, दाभाडेवस्ती, जोशीवस्ती, उंबरवस्ती, बुळेवस्ती, मुथाळणे गावठाणवाडी, दरेवस्ती, शिंदेफाटा मारकुलवाडी येथील ८६५ लोकसंख्येला चार खेपांद्वारे २९ मार्चपासून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Water Scarcity
Water Scarcity : शेतकऱ्यांप्रती सोलापुरात सत्ताधारी-विरोधी आमदारांच्या कळवळ्याला ऊत

सीतेवाडी, कठेवाडी, जोशीवाडी, गुळेवाडी येथील ५९० लोकसंख्येला ३० मार्चपासून तर आणे, आनंदवाडी, माळवाडी, गोडेशेत, तरळदरा, दरेवस्ती शिंदेफाटा, मारकुलवाडी येथील ३ हजार२७० लोकसंख्येला, अंजनावळे गावठाण व पसारवाडी, लव्हाळीवस्ती, दनानेवस्ती येथील १ हजार २५८ व निमगिरी खांडेचीवाडी येथील ६५० लोकसंख्येला ५ एप्रिलपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. कोपरे जांभूळशी, कवठेवस्ती, कुडाळवाडी, बांगरवाडी, काठेवाडी, कवठेवस्ती, माळेवाडी खांडेवस्ती येथील ९२२ लोकसंख्येला ६ एप्रिलपासून दोन खेपांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

तालुक्यातील गुळुंचवाडी गावठाण ठाकरवस्ती गणेशनगर खंडोबामाळ घायटावस्ती (लोकसंख्या १५००), हडसर पेठेचीवाडी (३५०), नळावणे गावठाण नवलेवाडी सुरकुळवाडी मोलदरा (१३६१), बांगरवाडी गावठाण (१४१०), सुकाळवेढे गावठाण ढेगळेवाडी (४९६), आलमे गावठाण, खंजीरवाडी, वंदेवस्ती, पिराचीवाडी, आश्रमशाळा पाझरतलाव, मुक्ताईवस्ती, गणेशनगर (२२६९), हातविज, सुपेवाडी, दुर्गवाडी (४३०) येथील टँकर प्रस्ताव मंजूर आहेत. आंबे गावठाण, नामदेववाडी, काठेवाडी, माळवाडी पिंपरवाडी (६२०) व सोनवळे गावठाण काठेवाडी, महावीरवाडी, बोराडेवाडी खरेवाडी (११६४) येथील दोन प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com