Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Amravati Water Shortage : अमरावती जिल्ह्यात रब्बीत पाणीटंचाई

यंदा पावसाचा वर्तविण्यात आलेला अंदाज बघता खरीप हंगामात पीकस्थिती बऱ्यापैकी राहणार असली तरी फळबागा व रब्बी हंगाम मात्र अडचणीचा जाण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

Team Agrowon

Amravati News : यंदा पावसाचा वर्तविण्यात आलेला अंदाज बघता खरीप हंगामात पीकस्थिती बऱ्यापैकी राहणार असली तरी फळबागा व रब्बी हंगाम मात्र अडचणीचा जाण्याचा कृषी विभागाचा (Agriculture Department) अंदाज आहे.

पावसाची सरासरी अपेक्षेपेक्षा थोडी कमी राहणार असली तरी कापसासाठी ती पूरक असून सोयाबीनसाठी नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे. तुरीच्या क्षेत्रात पाच टक्क्यांपर्यंतच वाढ संभव आहे.

आगामी खरीप हंगामात जिल्ह्यात ६.८१ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी प्रस्तावित आहे. कृषी विभागाने त्यासाठी बियाणे व खतांचे नियोजन केले आहे. हवामान खात्याने यावर्षी पावसाची सरासरी ९६ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला असून अन निनोचा प्रभाव राहण्याची शक्यताही वर्तविली आहे.

पावसाची सरासरी समाधानकारक राहणार असली तरी ती खंडित स्वरूपाची राहणार आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणीला सुरवात होते व ती जुलैच्या पहिल्या पंधरवड्याअखेरपर्यंत चालते.

यावर्षी पावसाची सरासरी कापसाच्या पिकासाठी अनुकूल असल्याचे सांगण्यात आले आहे. पावसाचे एकंदरीत वेळापत्रक बघितल्यास पेरणीनंतर सोयाबीन फुलोऱ्यावर असताना पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. अशावेळी या पिकांना धोका होणार आहे.

तर तुरीला यंदा मिळालेले भाव बघता पेरणी क्षेत्रात पाच टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी वर्तविली.

खरीप हंगाम बऱ्यापैकी व समाधानकारक राहणार असला तरी फळबागा व रब्बीसाठी तो अडचणीचा ठरू शकणार आहे. रब्बी हंगामात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. या हंगामात हरभरा व गहू ही प्रमुख पिके असून सिंचनाची आवश्यकता अधिक आहे.

पावसाची संभाव्य सरासरी बघता सिंचनासाठी पाण्याची टंचाई जाण्याची दाट शक्यता आहे. जलाशय व धरणांमध्ये पुरेसा साठा न राहिल्यास सिंचनाच्या अडचणी जाणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seafood Export: अमेरिकेच्या आयातशुल्क वाढीचा कोळंबी निर्यातीवर परिणाम, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंची माहिती

FSSAI Registration: दूध उत्पादक-विक्रेत्यांना एफएसएसएआय नोंदणी सक्तीची

Unseasonal Rain: माकणी परिसरात पाऊस, गारपीट

Krishi Kumbh Exhibition: ‘कृषिकुंभ’कडे मंत्री, लोकप्रतिनिधींची पाठ

Unseasonal Rain Damage: ‘अवकाळी’ने रब्बी पिकांसह फळबागांना फटका

SCROLL FOR NEXT