Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : चाळीसगाव तालुक्यात पाणीटंचाई वाढणार

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात पाऊस केवळ ८८.८ टक्के झाला आहे. यामुळे चाळीसगाव तालुक्यातील भूजलपातळीत दीड मीटरने घट झाली आहे. जळगाव, धरणगाव, चोपडा, अमळनेर, भडगाव तालुक्यांमधील पाणीपातळीत घट झाली आहे.

यामुळे पाण्याचा कमी वापर करण्याचे मत वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाने म्हटले आहे. चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर, पारोळा भागांत टंचाई जाणवू लागली असून, पुढे तीव्रता वाढेल, असेही दिसत आहे.

जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीला काही दिवस पावसाची कृपादृष्टी राहिली. त्यानंतर तब्बल दीड महिना पावसाने दडी मारली होती. जुलैच्या शेवटी आणि ऑगस्ट महिन्यातही फार थोडे दिवस पर्जन्यमान झाले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील तापी पट्ट्यात चांगला पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात ८८.८ टक्के पाऊस झाला आहे.

सप्टेंबरनंतर वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाकडून जिल्ह्याची पाणीपातळी तपासली जाते. निरीक्षणासाठी काही विहिरी निश्चित करण्यात येतात. यंदाही अशी तपासणी नुकतीच करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ, बोदवड, यावल, एरंडोल, जामनेर या सहा तालुक्यांमध्ये भूजलपातळीत वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील इतर तालुक्यांची पाणीपातळी परिस्थिती समाधानकारक असली, तरी गिरणाकाठच्या चाळीसगाव तालुक्याने मात्र प्रशासनाची चिंता वाढविली आहे. चाळीसगाव तालुक्यातील भूजलपातळी दोन मीटरने घटली आहे.

धुळे, नंदुरबारात संकट

धुळे व नंदुरबारात अनुक्रमे १९ व २० टक्के पावसाची तूट आहे. धुळ्यात ५६५ मिलीमीटर, तर नंदुरबारात ८५४ मिलिमीटर पाऊस पडतो. परंतु पाऊस हवा तसा पडला नाही. नंदुरबारात नोव्हेंबरमध्ये बेमोसमी पाऊस झाला.

यात शहादा व इतर भागांत अतिवृष्टी झाली. या पावसाने भूजलपातळीतील घट काहीशी थांबण्यास मदत होईल. परंतु नवापूर, नंदुरबार, शहाद्याचा पूर्वभाग टंचाईचा सामना करीत आहे. धुळ्यातही साक्री, शिंदखेडा, धुळ्यातील जलसंकट तयार होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : राज्यात सोयाबीन, मुग आणि उडदाची २०९ केंद्रावर केली जाणार हमीभावाने खरेदी 

Gokul Dudh Sangh : गोकुळची दुग्ध उत्पादने थेट परदेशात, पूर्व युरोपच्या अझरबैजान देशाला बटर पुरवठा

Rabi Season 2024 : बाजरी, कंदा लागवड घटणार; मका, तेलबिया पिकांकडे कल

Agriculture Award : दहा शेतकरी, दोन कर्मचाऱ्यांचा राज्य कृषी पुरस्काराने सन्मान

Water Scheme : जिल्हा परिषदेच्या पाणी योजना रखडल्या

SCROLL FOR NEXT