Water Scarcity : पाणी, चाराटंचाईसाठी भरघोस निधी देऊ

Fodder Shortage : परभणी जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे येत्या काळातील संभाव्य पाणीटंचाई व चाराटंचाई निवारणार्थ, तसेच नवीन रोहित्र उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करून प्रस्ताव सादर करावेत.
Sanjay Bansode
Sanjay BansodeAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे येत्या काळातील संभाव्य पाणीटंचाई व चाराटंचाई निवारणार्थ, तसेच नवीन रोहित्र उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करून प्रस्ताव सादर करावेत. यासाठी जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.

वार्षिक योजना २०२३-२४ अंतर्गत निधीचा खर्च अत्यंत कमी असून, जिल्हाधिकारी यांनी दर आठवड्याला बैठका घेऊन आढावा घ्यावा व शंभर टक्के निधी खर्च करावा अशा सूचना पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या.

सोमवारी (ता. ८) जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री बनसोडे यांच्या अध्यक्षतेत पार पडली. या वेळी ते बोलत होते. खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, आमदार सुरेश वरपूडकर, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार विप्लव बजोरिया, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून आदीची उपस्थिती होती.

Sanjay Bansode
Water Conservation : टंचाईच्या संकटात साठवण क्षमतावाढीसाठी उपाययोजना

या वेळी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षांकरिता विविध योजनासांठी ३९० कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्यात सर्वसाधारण वार्षिक योजनेसाठी २६३ कोटी रुपये, तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १२४ कोटी ७७ लाख रुपये आणि अनुसूचित जमाती उपयोजनेअंतर्गत २ कोटी २३ लाख रुपये अशा एकूण ३९० कोटी रुपये निधीचा समावेश आहे.

Sanjay Bansode
Water Storage : सांगली जिल्ह्यात प्रकल्पांमध्ये १० टक्के पाणीसाठा वाढला

वित्तीय मर्यादेच्या व्यतिरिक्त ४६९ कोटी ५१ लाख रुपये इतक्या अतिरिक्त रकमेचा प्रारूप आराखडा मंजुरीसाठी शासनास सादर करत, असल्याचे पालकमंत्री बनसोडे यांनी सांगितले. आमदार साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, की महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील पाणंद रस्त्याची कामे मार्गी लावण्यासाठी व नवीन तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळांना निधी उपलब्ध करुन द्यावा.

आमदार गुट्टे म्हणाले, की ग्रामीण भागात वारंवार रोहित्र बंद होत आहेत. हा प्रश्‍न तत्काळ मार्गी काढावा. या वेळी जिल्हाधिकारी गावडे यांनी २०२४-२५ चा प्रारूप आराखडा मान्यतेसाठी समितीसमोर सादर केला तसेच २०२३-२४ च्या खर्चाचा सविस्तर आढावा सादर केला. प्राप्त निधी शंभर टक्के खर्च करण्यात येईल, असे सांगितले. तसेच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी जिल्हा विकास आराखडा व पाथरी तीर्थक्षेत्र विकासाचा आराखडा या वेळी सादर केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com