Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : शिंदखेडा तालुक्यात टंचाईची समस्या

Water Crisis : शिंदखेडा तालुक्यात कमी पाऊस झाला होता. त्यात अनेक गावांत टंचाई तयार झाली आहे.

Team Agrowon

Dhule News : शिंदखेडा तालुक्यात कमी पाऊस झाला होता. त्यात अनेक गावांत टंचाई तयार झाली आहे. पूर्व व मध्य भागात टंचाई अधिक आहे. तसेच नंदुरबार सीमेलगतही टंचाईग्रस्त गावे वाढत आहेत. यामुळे पाण्यासंबंधी ग्रामस्थ, सरपंच प्रशासनाकडे धाव घेत आहेत. नुकतेच चिंचवार ग्रामस्थांनी पाण्यासाठी प्रशासनास निवेदन दिले.

चिंचवार येथे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. नाथरीपाडाजवळील चिरक्यावड धरणाच्या पायथ्याशी विहीर खोदून गावाला नळाद्वारे पाणी पुरवठा होतो. मात्र दुष्काळामुळे हे धरण कोरडे पडले आहे. परिणामी, विहिरीची पाण्याची पातळी खालावली असून पाणीपुरवठा योजना कोलमडली आहे.

त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असून, गुरांचे हाल होत आहेत. म्हणून अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे पाणी चिरक्यावड धरणात टाकावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या वेळी माजी सरपंच सोमनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य दात्ताभाऊ पाटील, रहीम पटेल आदी उपस्थित होते.

अशीच स्थिती पांझरा नदीकाठच्या गावांत तयार झाली आहे. नदीतून अनेक गावांसाठी जलस्रोत तयार करण्यात आले आहेत. परंतु नदीत पाणी नाही. पांझरा प्रकल्प १०० टक्के भरला होता. त्यातून धुळे शहरासह विविध गावांना पाणीपुरवठा केला जातो.

यामुळे प्रकल्पावरील पाणी मागणीचा भार वाढू लागला आहे. तसेच मध्यंतरी मंत्री अनिल पाटील यांनीदेखील शिंदखेडा व जळगावातील अमळनेर तालुक्यातील गावांना दिलासा मिळावा यासाठी पांझरा नदीचे पाणी मिळावे, नदीत आवर्तन सोडावे, अशी मागणी केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT