Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : ग्रामीण भागात पाणीटंचाई वाढली; उपाययोजना संथगतीने

Water Crisis : अर्धा एप्रिल महिना लोटला असून ग्रामीण भाग पाणी टंचाईने होरपळू लागला आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मंजूर केलेल्या उपाययोजना संथगतीने सुरू असल्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.

 गोपाल हागे

Akola News : अर्धा एप्रिल महिना लोटला असून ग्रामीण भाग पाणी टंचाईने होरपळू लागला आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मंजूर केलेल्या उपाययोजना संथगतीने सुरू असल्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाई निवारणासाठी १३६ उपाययोजना मंजूर केलेल्या आहेत. यापैकी काही कामे झाली असून बहुतांश प्रगतिपथावर आहेत. सध्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. दररोज यात भरच पडत आहे. अशात पाण्याची मागणी वाढली. ग्रामीण भागात पाण्याचे स्रोत कमी असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

अकोला जिल्ह्यात बराचसा भाग खारपाण पट्ट्यात मोडतो. या ठिकाणी पिण्याच्या गोड्या पाण्याचे स्रोत नसल्याने पाणीपुरवठा योजनांवर तहान भागवली जाते. या योजनांनाही देयके थकल्याने महावितरणकडून वसुलीसाठी धडाक्यात जोड कापण्याचे प्रकार याच काळात सुरू असतात. याचा फटका नागरिकांना पिण्याचे पाणी कुठे १५ तर कुठे २० दिवसांनंतर उपलब्ध होते.

ग्रामीण भागात उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २३८ गावांत पाणीटंचाई सदृश स्थिती असल्याचे प्रस्तावित केले होते. या गावांतील नागरिकांसाठी ५५० उपाययोजना देखील प्रस्तावित केल्या. प्रस्तावित उपाययोजनांपैकी जिल्हाधिकाऱ्यांनी १२५ गावांसाठी १३६ उपाययोजनांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

नळयोजना विशेष दुरुस्ती, विंधन विहीर, तात्पुरत्या पूरक नळयोजना, विहीर अधिग्रहण व कूपनलिकेच्या योजनांचा समावेश आहे. योजनांना मंजुरी दिल्यानंतर काही योजना १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु त्यानंतरही अद्याप काही उपाययोजना कागदांवरच आहेत. उन्हाच्या झळा वाढलेल्या असतानाच उपाययोजना अपूर्ण असल्याने टंचाई निवारणाच्या कामात यंत्रणांची अनास्था लपून राहिलेली नाही.

असा आहे संपूर्ण प्रस्तावित आराखडा

- नवीन विंधन विहिरी ः ८५ गावांसाठी १०१ उपाययोजना

- कूपनलिका घेणे ः ९३ गावांसाठी १०१ उपाययोजना

- नळ योजना विशेष दुरुस्ती ः चार गावांसाठी चार उपाययोजना

- तात्पुरत्या पूरक नळ योजना ः २३० गावांसाठी २३० उपाययोजना

- टॅंकरद्वारे पाणीपुरवठा ः तीन गावांसाठी तीन उपाययोजना

- खासगी विहिरींचे अधिग्रहण ः १०५ गावांसाठी १११ उपाययोजना

प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन

जिल्ह्यातील प्रकल्प यावर्षी बऱ्यापैकी भरले होते. मात्र, प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत आता ३० टक्के साठा शिल्लक राहिलेला आहे. यात काटेपूर्णा प्रकल्पात २३.६९ दलघमी (२७.४३ टक्के), वाण ३३.२१ (४०.५२), मोर्णा १३.०८ दलघमी (२१.५५), उमा १.५८ दलघमी (१३.५३), निर्गुणा ४.६१ दलघमी (१५.९८), दगडपारवा ५.३२ दलघमी (५२.२०), लघुप्रकल्प ३०.१४ दलघमी (९३१.५८) टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 21st Installment: 'या' दिवशी मिळू शकतात पीएम किसानचे २ हजार रुपये?; २१ व्या हप्त्याबद्दल महत्त्वाची माहिती

Monsoon Rain: परभणीत ११४७.५ मिमी, तर हिंगोलीत १३२०.६ मिमी पाऊस

Inspiring Farmer Story: कळसूबाईच्या जंगलातील संसारशाळा

Farmer Subsidy: अडीच हजार शेतकरी अनुदानापासून वंचित

Cashew Farming: नवीन काजू बागेत अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर

SCROLL FOR NEXT