Aslam Abdul Shanedivan
यंदा राज्यात पाणीबाणीचे संकट गडद होत असून मराठवाड्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना पाठोपाठ बीड जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद व सोयगाव तालुका वगळता ३११ गाव व ४८ वाड्यांना ४७३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे
जालना जिल्ह्यातील २१३ गाव व ५५ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३३६ टँकरची सोय करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील १४० गाव व १०५ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून येथे १९९ टँकर लागत आहेत.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत टंचाई निवारण्यासाठी १४८७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
टँकरला पाणीपुरवठा करण्यासाठी ४९८ तर टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी ९८९ विहिरी अधिग्रहित आहेत.