Water Scarcity : नगर जिल्ह्यात १४९ टँकरद्वारे पुरवठा

Water Crisis : नगर जिल्ह्यात यंदा उन्हाळ्याची आणि त्या बरोबरच दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. यंदा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती लवकरच जाणवू लागली.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon

Nagar News : उन्हाच्या चढत्या पाऱ्याबरोबर नगर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा ताण देखील वाढू लागला आहे. जिल्ह्यात १४८ गावे आणि ७८३ वाड्या-वस्त्यांवरील ३ लाख ५ हजार ८६६ इतया लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने १४९ टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे.

अजूनही बरीच गावे, वाड्या वस्त्यांना टँकेरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी होत आहे. त्यामुळे टँकरचा आकडा २०० पार जाण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यात यंदा उन्हाळ्याची आणि त्या बरोबरच दुष्काळाची तीव्रता अधिक आहे.

Water Scarcity
Water Scarcity : मीना नदीचे पात्र पडले कोरडे

यंदा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती लवकरच जाणवू लागली. त्यातच उन्हाच्या चढत्या पाऱ्यामुळे पाणीसाठ्यांचा जलस्तर झपाट्याने खाली जाऊ लागला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावणाऱ्या गावांची आणि वाड्याची संख्या एप्रिल येता-येता लक्षणीय वाढली.

एकीकडे लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाने घोषित केली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या नेतृत्वाखाली आणि नियंत्रणाखाली लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पुढे जात असतानाच दुसरीकडे दैनंदिन कामकाज आणि टंचाईच्या उपाययोजनांची प्रशासनाच्या वतीने दक्षता घेतली जात आहे.

Water Scarcity
Water Scarcity : केंदूर, पाबळमध्ये भीषण पाणीटंचाई

स्थानिक पातळीवरील यंत्रणेने टंचाई परिस्थितीवर गांभीर्याने काम करावे, आवश्यकतेनुसार पिण्याचे पाण्याचा पुरवठा करावा, टँकरचे प्रस्ताव प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकारी यांच्याकडे आहेत.

एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात टँकरची संख्या १०० झाली होती. जिल्ह्यात १४८ गावे आणि ७८३ वाड्यावर त्यावरील तब्बल तीन लाख ५ हजार ८६६ इतया लोकसंख्येला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी १४९ टँकर सुरू आहेत. अजूनही टॅंकरने पाणी देण्याची मागणी वाढतच आहे. या वर्षी टॅंकरची संख्या दोनशेच्या वर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com