Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : इगतपुरीतील वाड्या-पाड्यांत पाणीटंचाई

Water Crisis : पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरीत एप्रिलमध्ये भीषण पाणीटंचाईला आदिवासी नागरिकांना सामोरे जावे लागत आहेत.

Team Agrowon

Nashjk News : पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरीत एप्रिलमध्ये भीषण पाणीटंचाईला आदिवासी नागरिकांना सामोरे जावे लागत आहेत. पावसाळ्यात सुमारे चार हजार मिमी पाऊस पडत असूनही पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे पाणीटंचाईच्या झळा आतापासूनच सुरू झाल्या आहेत.

भावली धरणातून ३२ कोटी रुपये खर्चून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची पाइपलाइन घेतली आहे. मात्र तरीही इगतपुरी शहरात पाच वर्षांपासून आठवड्यातून तीन दिवसच पाणीपुरवठा केला जात आहे.

नगर परिषद हद्दीतील तळेगाव शिवारातील कातुरवाडी, वाघाचा झाप, मेंगाळ झाप या वस्तीमधील दोनशे ते अडीचशे लोकसंख्या वस्ती असलेल्या आदिवासी नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

या वाडीच्या नागरिकांना थेट दोन किलोमीटर असलेल्या घाटनदेवी मंदिरसमोरील खोल उंट दरीतील झऱ्यातील पाणी पिण्यासाठी आणावे लागत आहे. मात्र वर्ष उलटून गेले तरीही या पाइपलाइनला पाणी आलेच नाही.

आमचा पाडा ३० वर्षापासून नगरपरिषद हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र अद्याप ही आमच्याकडे नळ कनेक्शन जोडण्यात आलेले नाहीत. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत लोकप्रतिनिधी, नगरसेवक समस्या सोडविण्याचे आश्‍वासन देता.मात्र अद्यापही समस्या जैसे थे आहे.
- वासुदेव वाघ, स्थानिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pesticide Price Increase : कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत

Water Storage: देशातील मोठी ४० टक्के धरणे निम्मी रिकामी, महाराष्ट्रात किती पाणीसाठा?

Unseasonal Rain Damage: धाराशिव जिल्ह्यात दीड हजार हेक्टरला पूर्वमोसमीचा फटका

Farmers Agitation: अन्नत्यागातून शेतकऱ्यांप्रति सहवेदना

Paddy Disease: धान पिकावर करपा रोग

SCROLL FOR NEXT