Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : शिराळ्यात पाणीटंचाईच्या झळा

Water Level Update : चांदोली धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊन चार महिन्यांत ९.७७ टीएमसीने कमी झाला.

Team Agrowon

Sangli News : शिराळा तालुक्यात पाऊस सरासरीहून कमी झाला तसेच परतीच्या व अवकाळी पावसानेही पाठ फिरवली. परिणामी जानेवारीपासूनच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. चांदोली धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊन चार महिन्यांत ९.७७ टीएमसीने कमी झाला.

गतवर्षीपेक्षा ४.६९ टीएमसीने साठा यंदा कमी झाला आहे. तालुक्यातील ४९ पाझर तलावांपैकी ४ कोरडे पडले आहेत. परिणामी भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याचे भीती निर्माण झाली असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

वारणा धरणात गेल्या चार महिन्यांत १०.७७ टीएमसी पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. गतवर्षी हा साठा १९.६९ टीएमसी, म्हणजे यंदापेक्षा ४.६९ टीएमसीने कमी आहे. सध्या फक्त वीजनिर्मिती केंद्रातून १६१० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीत १६१० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. या धरणात केवळ १६.७४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

तालुक्यात तालुक्यातील ४९ पाझर तलाव आहेत. या पाझर तलावातील पाणीसाठा शेतीसाठी उपयुक्त ठरतो. मात्र, शिराळा तालुक्यात पावसाने सरासरीही गाढली नाही. यामुळे तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ४९ पाझर तलावांपैकी ४ कोरडे पडले आहेत. ४२ तलावांमध्ये सरासरी ४० टक्क्यांहून कमी साठा आहे. परिणामी पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

प्रतिवर्षी तालुक्यातील तलावात मार्च, एप्रिलपर्यंत पाणी असते. मात्र या वर्षी पाणीसाठा ऑक्टोबरपासून झपाट्याने कमी झाला आहे. गावोगावच्या तलावांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. अनेक गावांचे तलाव आटले आहेत. ओढ्यांचे प्रवाह थांबले आहेत.

डोंगररांगातील नैसर्गिक झऱ्यांचे पाणी आटले आहे. विहिरी व कूपनलिकांच्या पाण्यावरही विपरित परिणाम झाला असून आतापासून पाणी अपुरे पडायला लागले आहे. पाणीसाठे कोरडे पडल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तालुक्यातील धरणांतील पाणीसाठा

धरण पाणीसाठा(टक्के)

मोरणा मध्यम प्रकल्प ३९

करमजाई ७६

शिवणी ०

रेठरे धरण १९

कार्वे १८

मानकरवाडी २७

टाकवे ४२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT