Pune News : राज्यात गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवली. यामुळे यंदा फेब्रुवारीतच दुष्काळाच्या झळा राज्याला बसत आहेत. तर राज्यातील अनेक धरणातील पाण्याचा साठा जानेवारीतच कमी झाला. याचा थेट परिणाम शेतीच्या उपस्यावर झाला आणि उपसा बंद करण्यात आला. तर शेतीसह पिण्यास पाणी नसल्याने राज्यातील ४० ठिकाणी दुष्काळ जाहिर करण्यात आला. यादरम्यान गेल्या चार एक दिवसात विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी आणि गारपिटीने हाहाकार माजवला आहे. तर नाशकावर फेब्रुवारीच्या मध्यातच दुष्काळाचे सावट घोंगावत आहे.
पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हं
नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणं ही फेब्रुवारीच्या मध्यातच आटू लागली आहेत. जिल्ह्यातील २४ लहान मोठ्या धरणांमधील पाणीसाठा सध्या ५० टक्क्यांच्या खाली गेला असून तो ४९ टक्क्यांवर आला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या ६४ टक्के पाणीसाठा आहे. तर जिल्ह्यातील १६ धरणांमध्ये ५० टक्क्यांहून कमी पाणीसाठा झाला आहे. तसेच येथील नाग्यासाक्या धरण कोरडं ठाक पडले असून या धरणात शून्य टक्के पाणीसाठा राहिला आहे. यामुळे आगामी काळात नाशकात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हं दिसत आहेत.
दरम्यान एकीकडे दुष्काळाचे सावट असताना दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हाहाकार माजवला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर हातातोंडाशी आलेलं रब्बीचे पीक निसर्गाचे हिसकावले. यामुळे शेतकरी सध्या चिंतेत पडला आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपीट
अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका हा नागपूर जिल्ह्याला बसला असून येथे ४०२९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर वादळी वारा, अवकाळी आणि गारपीटमुळे ३७३४ हेक्टरवरील शेत पिकांना फटका बसला आहे. ही आकडेवारी प्राथमिक सर्वेक्षणातून समोर आली आहे. तर १० आणि ११ फेब्रुवारीला नागपूरसह विदर्भातील अनेक भागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले होते.
राज्यावर दुष्काळाचे सावट
गेल्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे पाऊस कमी झाला. ज्यामुळे यंदा पहिल्यांदाच जानेवारीतच धरणांतील पाणीपातळी कमी झाली. तसेच राज्यातील १७ धरणांमध्ये शून्य टक्क्याहून खाली पाणीपातळी गेली. ३७ धरणांमध्ये फक्त एक ते १० टक्क्यांच्या दरम्यान पाणीपातळी शिल्लक राहिले आहेत. येत्या काळात उर्वरित धरणेही कोरडी पडण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यावर दुष्काळाचे सावट आहे.
पाणी टंचाईचे सावट
सध्या राज्यात ऊन थंडीचा खेळ सुरू आहे. उन्हाचा चटका देखील अनेक जिल्ह्यात बसत आहे. ज्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. धरणातील पाणीसाठा आटत चालला आहे. सध्या राज्यातील १७ हून अधिक धरणांनी तळ गाठला असून आगामी काळात यात आणखी धरणांची भर पडेल. तर मराठवाड्यातील ९२० धरणांत केवळ २८ टक्के पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे राज्यावर भीषण पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.