Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Water Crisis: राज्यात पाणीटंचाईचे संकट

Water Scarcity: राज्यात चांगला पाऊस होऊनही यंदाही राज्यासमोर पाणीटंचाई आ वासून उभी आहे. आठ दिवसांपूर्वी ४४८ वाड्या आणि गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती होती.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: राज्यात चांगला पाऊस होऊनही यंदाही राज्यासमोर पाणीटंचाई आ वासून उभी आहे. आठ दिवसांपूर्वी ४४८ वाड्या आणि गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती होती. आठवडाभरात गावे व वाड्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तर राज्यातील मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठाही झपाट्याने कमी होत आहे. सध्या राज्यातील लहान-मोठ्या जलाशयांमध्ये ३८.५८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मागील वर्षी राज्यात पर्जन्यमान चांगले असल्याने सर्व प्रकल्प तुडुंब भरले होते. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही, असे भाकित राजकीय नेते व्यक्त करत होते. मात्र, प्रकल्पांमधील पाणी झपाट्याने कमी होत आहे. तसेच गेल्या १५ दिवसांपासून राज्यात अपवाद सगळता सर्वत्र ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही वेगाने वाढत आहे.

१५ एप्रिलपर्यंत राज्यातील ३५८ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. तर १०२६ वाड्यांमध्येही भीषण पाणीटंचाई आहे. सध्या राज्यात ४७८ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून हीच आकडेवारी गेल्या वर्षी १९९७ होती. १५ एप्रिल रोजी पाणीटंचाई असलेल्या गावांची संख्या दुपटीने वाढण्याची शक्यता असून प्रकल्पांमधील पाणीसाठही झपाट्याने कमी होत आहे.

मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेत केवळ सात टक्क्यांनी अधिक आहे. मागील वर्षी २० एप्रिल रोजी ३०.६२ टक्के पाणीसाठा होता. तोच आता ३७.२६ टक्के आहे. राज्यातील लहान मोठ्या प्रकल्पांमध्ये नागपूर विभागात ३८.९६ टक्के, अमरावती विभागात ४८.७८ टक्के, संभाजीनगर विभागात ३७.८८, नाशिक विभागात ४२.५५, पुणे विभागात ३२.४१, कोकण विभागात ४८.१० असा एकूण लहान-मोठ्या प्रकल्पांतील ३८.५८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मागील वर्षी २० एप्रिल रोजी ३३.२३ टक्के पाणीसाठा होता. मागील वर्षी आणि यंदाच्या पाणीसाठ्यात फारसा फरक नाही. लघू प्रकल्पांमध्ये ३६.७७ टक्के पाणी असून मागील वर्षी हा साठा ३५.१३ टक्के होता.

महत्त्वाच्या प्रकल्पांतील पाणीसाठा (टक्केवारी)

गोसीखुर्द २२.६७

बावणथडी १२.८८

जायकवाडी ४४.९३

भंडारदरा ५६.२८

दूधगंगा २५.९६

राधानगरी ५४

नीरा देवघर १८.७७

कोयना ३६.७२

उरमोडी ४८.५५

खडकवासला ५०.४२

भामा आसखेड ३७.८

भातसा ४४.८३

मोडकसागर ४२.३७

तानसा ३४.९६

बारवी ४१.७६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture MSP: शनिवारपासून सोयाबीन, मूग, उडीद हमीभावाने खरेदी सुरू!

Weather Update: महाराष्ट्रात कडाक्याची थंडी; उत्तरेकडील जिल्ह्यांत तापमान घसरले

Market Update: सोयाबीनचा दर टिकून, मुगावर दबाव कायम

Solar Pump Scheme: अठरा हजारांवर शेतकऱ्यांना सौरकृषिपंपाची प्रतीक्षा

Post Harvest Management: संत्रा फळाचे काढणीपश्चातचे नुकसान टाळण्यासाठी सोपे उपाय

SCROLL FOR NEXT