Nanded Water Storage : नांदेड जिल्ह्यातील ८० लघू प्रकल्पांत २२ टक्के पाणीसाठा

Water Crisis : सध्या एकूण १०४ प्रकल्पांत २५२.५५ दशलक्ष घनमीटरनुसार ३४.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
Water Shortage
Water Storage Agrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्ह्यात तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. यासह शेतीसिंचनासाठी पाणी सोडण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. जिल्ह्यातील ८० लघू प्रकल्पातील पाणीसाठा २२ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. सध्या एकूण १०४ प्रकल्पांत २५२.५५ दशलक्ष घनमीटरनुसार ३४.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात मागील वर्षी पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे संपूर्ण प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. यामुळे जिल्ह्यातील सर्वच १०४ प्रकल्पांत समाधानकारक पाणीसाठा झाला होता. परंतु यंदा तापमानात झालेली वाढ यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. तसेच शेतीसिंचनासाठी पाणी पाळ्या देण्यात आल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे.

Water Shortage
Water Scarcity : दोन महिने पुरेल एवढाच जलसाठा

आजघडीला जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात सध्या प्रकल्पात २८.२५ दलघमीनुसार ३४.९७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार (बारुळ) प्रकल्पात ६५.६५ दलघमीनुसार ४७.५० टक्के पाणीसाठा आहे. यासोबतच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पांत ४७.०३ दलघमीनुसार ३३.८२ टक्के पाणीसाठा आहे.

चार कोल्हापुरी बंधाऱ्यात ०.०१ दलघमीनुसार ०.१३ टक्का पाणीसाठा आहे, ८० लघू प्रकल्पात ३७.६१ दलघमीनुसार २१.७६ टक्के पाणीसाठा आहे. नऊ उच्च पातळी बंधाऱ्यात ७४.०० दलघमीनुसार ३८.९९ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात एकूण १०४ प्रकल्पांत २५२.५५ दशलक्ष घनमीटरनुसार ३४.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Water Shortage
Nanded Water Scarcity : ऊन सोसल, पण तहान कशी भागवायची?

नांदेड जिल्ह्याशेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ४६५.७० दलघमीनुसार ५७.५१ टक्के पाणीसाठा आहे. तर सिद्धेश्‍वर प्रकल्पात ४२.९८ दलघमीनुसार ५३.०९ टक्के पाणीसाठा आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील ऊर्ध्व पैनगंगा (इसापूर) या प्रकल्पात ५१८.७४ दलघमीनुसार ५३.५१ टक्के पाणीसाठा शिल्लक आह, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

नांदेड पाटबंधारे मंडळातील प्रकल्पनिहाय पाणीसाठा

प्रकल्प दलघमी टक्केवारी

विष्णुपुरी २८.२५ ३४.९७

मानार ६५.६५ ४७.५०

मध्यम प्रकल्प (९) ४७.०३ ३३.८२

लघू प्रकल्प (८०) ३७.६१ २१.७६

उच्चपातळी बंधारे (९) ७४.०० ३८.९९

एकूण प्रकल्प १०४ २५२.५५ ३४.६९

जिल्ह्याशेजारील प्रकल्प

येलदरी ४६५.७० ५७.५१

सिद्धेश्‍वर ४२.९८ ५३.०९

इसापूर ५१८.७४ ५३.५१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com