
Latur News : तालुक्यात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असून दुसरीकडे शिवारातील साठवण तलावातील घसरणारी पाणीपातळी चिंता वाढवत आहे. सध्या १४ पैकी दोन तलावात मृतसाठा आहे. यात जंगमवाडी व हावरगा येथील तलावाचा समावेश आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंतचे दिवस कसे काढायचे हा प्रश्न आहे.
शहर व तालुक्यात एप्रिलमध्ये उन्हाची तीव्रता कमालीची वाढली आहे. दुसरीकडे शिवारातील विहिरींनी तळ गाठण्यास सुरवात केलेली आहे. तर साठवण तलावातील जलसाठा घसरत असल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे चित्र आहे.
अनेक पाझर तलाव तर केव्हाच आटले आहेत. विंधनविहिरींची पाणीपातळी घसरली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. यामुळे फळबाग, भाजीपाला,रब्बीपिके व दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
कडक उन्हाळ्याच्या दिवसांत पशुपालकांना यंदाही पाणी टंचाईची चिंता आहे. तर आता टँकर व अधिग्रहण प्रस्ताव पंचायत समितीकडे येत असून एक टँकर व एक अधिग्रहण मंजूर असल्याचे गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार व सहायक प्रशासन अधिकारी सचिन काडवादे यांनी सांगितले.
तालुक्यात ता.१७ पर्यंत हाळदवाढवणा ३७.०५ टक्के, डोंगरगावला २५, माळहिप्परगात २२.७०, रावणकोळात १९.९६, केकतसिंदगीत ३७.०५, ढोरसांगवीत १२.३७ टक्के, चेरा क्रमांक एक तलावात २२.४४ तर चेरा क्रमांक दोन तलावात २३.४३, सोनवळा येथे ३८.३०, धोंडवाडीत ४४.४७, गुत्ती क्रमांक एक तलावात ३७.९५, गुत्ती क्रमांक दोन तलावात ३३.३३ टक्के इतका जलसाठा असल्याचे पाटबंधारे उपविभागाचे अभियंता पी.एफ.चौधरी यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.