Water Shortage Water Shortage
ॲग्रो विशेष

Water Shortage : राज्यात पाणी टंचाईचे चटके; छ. संभाजी नगरमधील धरणांचा पाणीसाठा २० टक्क्यांवर, टँकरही वाढले

Water Issue : राज्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट तीव्र झाले असून पाण्यासाठी महिला वर्गाला पायपीट करावी लागत आहे. तर अनेक गावांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. दरम्यान छत्रपति संभाजी नगर जिल्ह्यात सध्या धरणांतील पाणीसाठा २० टक्क्यांच्या आत आला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मागील वर्षी सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडल्याने यंदा राज्यातील बहुतांश गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील विहिरी, हातपंपासह नद्या देखील कोरड्या पडल्या आहेत. यामुळे महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू झाली आहे. दरम्यान राज्यातील अनेक मोठ्या धरणातील पाणीसाठा सतत कमी होत असून तो आता ३६.५२ टक्क्यांवर आला आहे. तर राज्यातील सर्व धरणांचा पाणीसाठा हा ३७.०१ टक्केच शिल्लक राहिला आहे. जो गेल्या वर्षी ४५.७४ टक्के होता. 

सर्व मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा 

तर महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार राज्यातील सर्व १३८ मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा हा ३६.५२ टक्के झाला असून तो मागील वर्षी ४४.०७ टक्के होता. यात नागपूर विभागातील १६ धरणांमध्ये पाणीसाठा- ४८.१३, अमरावती विभागातील १० प्रकल्पात- ४४.७२ टक्के, छ.संभाजीनगर विभागातील ४४ प्रकल्पात- २०.९९ टक्के, नाशिक विभागात २२ प्रकल्पातील पाणीसाठा सध्या ३८.५६ टक्के असून पुणे विभागातील ३५ प्रकल्पात ३५.२२ टक्के पाणीसाठा आहे. तर कोकण विभागात असणाऱ्या ११ प्रकल्पात ४३.८३ पाणीसाठा शिल्लक आहे. 

टँकरने पाणी पुरवठा 

वाढत्या उन्हाच्या झळा आणि वाढत्या पाणी टंचाईमुळे छ. संभाजीनगर जिल्ह्यातील २५१ गावे आणि ४५ वाड्यावस्त्यांवर पाणीबाणीचे संकट आले आहे. येथील सर्व धरणामधील पाणीसाठा हा १९.१५ टक्के शिल्लक असून तो मागील वर्षी याच दिवशी ४५.२५ टक्के होता. तर सध्या ४१२ खाजगी टँकरमधून पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या संकेत स्थळावर मिळत आहे. यापाठोपाठ जालना जिल्ह्यात २८६ टँकरने पाणी पुरवठा सुरू असून बीडमध्ये सरकारी १ आणि ११६ खाजगी टँकरमधून पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. छ. संभाजीनगर आपेगाव धरण आणि जायकवाडी धरणात क्रमश: ४१.४३ आणि २०.२७ टक्के पाणीसाठा शिक्कल आहे. 

याशिवाय जळगाव जिल्ह्यात देखील तीव्र पाणी टंचाई जाणवत असून पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी (ता. धरणगाव) गावातच तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तर येथे जिल्ह्यातील ४२ गावांना ६४ खाजगी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 

सगळ्यात जास्त आणि सर्वात कमी टँकर 

तर राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये सध्या धरणातील पाणीसाठा हा कमी झाल्याने पाणीपुरवठ्यावर अडचणी येत आहेत. सध्या राज्यात सगळ्यात जास्त टँकर हे छ. संभाजीनगरमध्ये फिरत असून येथे ४१२ टँकर पाणीपुरवठा करत आहेत. तर सगळ्यात कमी धुळे जिल्ह्यात टँकर लागत असून येथे फक्त ५ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. 

राज्यात कुठे टँकर आणि किती

जालना-२८६, बीड-११७, सोलापूर-३८, सांगली-७७, सातारा-१५७, पुणे-९२, अहमदनगर-१०५, जळगाव-६४, नाशिक २०७, पालघर-२६, रायगड-१३ आणि ठाण्यात २८ टँकर पाणीपुरवठ्यासाठी सध्या सुरू आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT