Marathwada water shortage : मराठवाड्यात पाण्याची टंचाई; २ जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासाठी टँकरांच्या फेऱ्या

water shortage : मराठवाड्यातील धरणातील पाणीसाठा वेगाने घटत चालला असून मध्यम आणि लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. यामुळे मार्चच्या सुरूवातीलाच मराठवाड्यातील दोन जिल्ह्यात पाणीटंचाईचे गंभीर बनली आहे.
Water Shortage
Water ShortageAgrowon

Pune News : मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच राज्यातील विविध जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती गंभीर बनली आहे. अनेक जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी झाला असून याचा थेट परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे. मराठवाड्यात देखील उन्हाळ्याच्या आधीच दुष्काळाच्या झळा पोहचल्या आहेत. येथील दोन जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई झाली असून ५२० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर ४५० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 

अजून मे महिना दूर असून आता कुठे मार्च महिना सुरू झाला आहे. यादरम्यान उन्हाचा तीव्र झळा बसू लागल्या आहेत. मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर बनत चालला असून छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल आहे. यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले असून दोन्ही जिल्ह्यातील ५२० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

Water Shortage
Water Shortage : लघु, मध्यम प्रकल्पात उरले केवळ १५ टक्के उपयुक्त पाणी

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी संकट 

तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून येथे सद्यस्थितीला २७९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. येथे सद्य स्थितीत १२६ गावे आणि २९ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून १८९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 

जालन्यात १२९ टँकर 

छत्रपती संभाजीनगर प्रमाणेच जालना जिल्ह्यात देखील पाणीटंचाईच्या तीव्र झळा लोकांना सोसाव्या लागत आहेत. येथील ७० गावे आणि २६ वाड्यांमध्ये १२९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

Water Shortage
Water Shortage : जळगाव जिल्ह्यातील टंचाईग्रस्त २२ गावांना २६ टँकरने पाणी

मराठवाड्यातील धरणांची स्थिती

दरम्यान गेल्या आठवड्यात जलसंपदा विभागाने मराठवाड्यातील धरणांबाबत माहिती देताना मोठ्या ११ धरणात ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे म्हटले होते. तसेच ९० लघु प्रकल्प कोरडे पडले असून २५९ धरणांची पाणीपातळी ही जोत्याखाली गेल्याचे सांगितले होते.

तसेच विभागाने मध्यम प्रकल्पाबाबत माहिती देताना, मराठवाड्यातील तीन मध्यम प्रकल्पातील पाणी पुर्णपणे आटले असून २४ मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेल्याची माहिती दिली होती. तसेच यात मार्च अखेर आणखी वाढ होईल असेही जलसंपदा विभागाने म्हटले होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com