Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water shortage : छत्रपती संभाजी नगर, बीड, यवतमाळला पाणी टंचाईच्या झळा; मुंबईकरांच्या चिंतेतही वाढ

Drought Conditions : गेल्या वर्षी सरासरी पेक्षी कमी झालेल्या पावसामुळे यंदा राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. तर छत्रपती संभाजी नगर, बीड, यवतमाळला पाणी टंचाईच्या झळांचा सामना करावा लागत आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेल्या वर्षी सरासरी पेक्षी कमी पडलेल्या पावसामुळे या वर्षी राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तर शासनाने याआधीच राज्यातील ४० तालुके आणि १०२१ मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र वाढत्या उन्हामुळे छत्रपती संभाजी नगर, बीड, यवतमाळ जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट गडद झाले असून पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. तर मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली असून नागरिकांना पाणी काटकसरीने व जपून वापरण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत. 

जिल्ह्यातील ९०२ गावांत पाणी टंचाई 

राज्यातील पाणी टंचाईचे संकट गडद होत असून मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. येथे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्या-पाण्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या कृती आराखड्आनुसार जिल्ह्यातील ९०२ गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता असून सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.  

महिलांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट 

यवतमाळ जिल्ह्यात देखील उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. तर उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावरील ४२ गावांना सर्वाधिक पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पैनगंगा नदीत पाणी सोडण्याची मागणी करूनही प्रशासन यावर उदासीन आहे. निवडणूकीच्या कामात पाटबंधारे विभागाचे कर्मचारी गुंतल्याने गावातील महिलांना एका पाण्याच्या हंड्यासाठी रानावनात पायपीट करावी लागत आहे. 

बीडमध्ये टँकर मंजुरीकरण

बीडमध्ये देखील सध्या पाणी टंचाईचा सामना लोकांना करावा लागत आहे. येथे अनेक गावात पाणी संकटाची भीषणता लक्षात घेऊन प्रशासन कामाला लागले आहे. तर टँकरने पाणी पोहचवले जात आहे. तसेच बीड, गेवराई, माजलगाव आणि अंबाजोगाई तालुक्यामधून टँकर प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवले जात आहेत. तर येत्या काळात यात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या बीड तालूका- ६०,  गेवराई तालूका - ४० असे टँकर प्रस्ताव प्रशासनाकडे गेले आहेत.  

धरणांमध्ये ३२.३२ टक्के पाणीसाठा

राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असतानाच आता मुंबईकरांच्या चिंतेत देखील भर पडली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ ३२.३२ टक्केच पाणीसाठा शिल्लक असून तो पुढील दोन महिने पुरेल इतकाच आहे. मुंबईला तानसा, मध्य वैतरणा, उर्ध्व वैतरणा, तुळशी, मोडक सागर, भातसा, विहार या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavistar AI App: ‘महाविस्तार एआय’कडे दुर्लक्ष; नोंदणीला मंद गती

Unseasonal Rain: पश्चिम विदर्भात पूर्वमोसमीचा सलग तडाखा

Marathwada Water Stock: मराठवाड्यात प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने घटतोय

Village Story: आठवणींची फुलवात...

El Nino Impact on Monsoon: एप्रिल महिन्यात पाऊस दणका देणार का?

SCROLL FOR NEXT