Jayakwadi Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Dam : प्रतिक्षा संपली ! नाशिकमधून जायकवाडी धरणात सोडलं पाणी

Marathwada Water : राज्य शासनाच्या आदेशानंतर शुक्रवारी रात्री उशिरा नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले.

Swapnil Shinde

Chhatrapati Sambhaji Nagar News : यंदा माॅन्सूनच्या पावसाने मराठवाड्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे जायकवाडी धरणात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे समन्वय पाणी वाटप कायद्यानुसार ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून पाणी सोडण्याची मागणी होत होती. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष सुरू झाला होता. दरम्यान, राज्य शासनाने नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी रात्री उशिरा दारणा धरणातून जायकवाडी धरणाच्या दिशेने पाणी सोडले.

मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणात सध्या पाणी साठा ४५ टक्कांवर आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निवड्यानुसार जायकवाडी धरणातील पाणी साठा ६५ टक्क्यांच्या जवळपास असावा, यासाठी ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून पाणी सोडले जाते. त्यानुसार यंदा मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीसाठी ८.६ टीएमसी इतके पाणी सोडण्याचे आदेश दिले होते.

त्यावरून उत्तर महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष सुरू आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व साखर कारखानदारांनी विरोध केला. पाण्यावरून रस्त्यावरच्या लढाईसोबत न्यायालयीन लढाई सुरू झाली. यात सर्वोच्च न्यायालयाने जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास ग्रीन सिग्नल दिला.

राज्य शासनाने शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दारणा धरणातून १०० क्यूसेकने विसर्ग करण्यात आला. शासन आदेशानुसार मुळा (मांडओहोळ व मुळा) प्रकल्पातून २.१०, प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर) प्रकल्पातून ३.३६, गंगापूर धरणातून (गोदावरी, काश्यपी, गौतमी गोदावरी), ०.५, गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) प्रकल्पातून २.६४ टीएमसी असे एकूण ८.६०३ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत ८ निर्णयांना मान्यता; राज्यात १० उमेद मॉल उभारण्यात येणार

Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा तूर्तास टळला?

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Agricultural Scheme: शेतकऱ्यांनो, ट्रॅक्टरसह कृषी अवजारांसाठी सरकारकडून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान

Soybean Pest Control : सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्यांचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT