Nira Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Dams Update: भाटघर, नीरा-देवघरमधून विसर्ग बंद

Monsoon Rain Update: नीरा धरण साखळीतील भोर तालुक्यातील भाटघर व नीरा-देवघर धरणांसह राजगड तालुक्यातील गुंजवणी आणि पुरंदर तालुक्यातील वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सोमवारी (ता. ४) सकाळी पूर्णपणे थांबविण्यात आला.

Team Agrowon

Pune News: नीरा धरण साखळीतील भोर तालुक्यातील भाटघर व नीरा-देवघर धरणांसह राजगड तालुक्यातील गुंजवणी आणि पुरंदर तालुक्यातील वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सोमवारी (ता. ४) सकाळी पूर्णपणे थांबविण्यात आला. मागील तीन-चार दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणात येणारे पाणीही कमी झालेले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने हा निर्णय घेतला. 

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे भाटघर आणि नीरा-देवघर धरणे भरण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे २७ जुलैला भाटघरमधून आणि २८ जुलैला नीरा-देवघरमधून पाणी सोडण्यात आले. भाटघर धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून आणि दरवाजांमधून पाणी सोडण्यास सुरुवात केली.

नीरा-देवघर धरणावरील वीजनिर्मिती केंद्राचे काम सुरू असल्यामुळे धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर गुंजवणी धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून पाण्याचा विसर्ग सुरू होता. तीनही धरणांमधील पाणी हे वीर धरणात जात असल्यामुळे वीर धरणाच्या कालव्यातून आणि दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू होता. पाऊस कमी झाल्यामुळे ३१ जुलैला नीरा-देवघर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद केला.

भाटघर आणि गुंजवणी धरणाच्या दरवाजांमधून होणारा पाण्याचा विसर्ग शनिवारी (ता. २) बंद करण्यात आला. गुंजवणी धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून २५० क्युसेकने होणारा विसर्ग रविवारी (ता. ३) बंद करण्यात आला. तर भाटघर धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून १ हजार ६३१ क्युसेकने होणारा विसर्गही सोमवारी (ता. ४) सकाळी थांबविण्यात आला. 

धरणात येणाऱ्या पाणीसाठ्यात वाढ होऊन धरणे १०० टक्के भरल्यानंतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद केला असला तरीही धरणाच्या दरवाजांच्या फटीमधून पडणाऱ्या पाण्याचा आवाज आणि मनमोहन दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Cultivation : सततच्या पावसाने ऊस पीक धोक्यात

Crop Damage Survey : सांगली जिल्ह्यातील दीड हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

Water Project Storage : सातपुड्यातील प्रकल्प भरू लागले

Bajari Sowing : खानदेशात बाजरी पीक जोमात

Crop Insurance : शेतकऱ्यांना मिळणार १२७ कोटींची भरपाई

SCROLL FOR NEXT